Mumbai Sakal
मुंबई

मुंबई : माजी मंत्र्यांसाठी ‘यिन फोरम’

नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते उद्‍घाटन; मान्यवरांनी दिला जीवनाचा कानमंत्र

सकाळ ऑनलाईन टीम

मुंबई: ‘सकाळ’ माध्यम समूहाच्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’ (यिन)तर्फे आयोजित शॅडो कॅबिनेट मंत्रिमंडळाच्या तीन दिवसांच्या विशेष अधिवेशनात विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी युवकांना यशस्वी जीवनाचा कानमंत्र दिला. ‘यिन’च्या माजी मंत्र्यांसाठी ‘यिन फोरम’ची सुरुवात शनिवारी करण्यात आली. शिवसेना नेत्या आणि विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या हस्ते फोरमचे उद्‍घाटन करण्यात आले.

‘‘यिन’चे जाळे राज्यभरात विस्तारले आहे. गेल्या सात वर्षांत ‘यिन’ मंत्रिमंडळाच्या निमित्ताने अनेक ठिकाणी नवीन नेतृत्व उदयास आले आहे. मंत्रिपदावरून पायउतार झाल्यानंतरही ‘यिन’चे तरुण माजी मंत्री वेगेवेगळ्या क्षेत्रांत कार्यरत आहेत. त्यांना ‘यिन फोरम’च्या माध्यमातून पुन्हा एकदा जोडण्यात आले आहे. ‘यिन’च्या माध्यमातून तरुणांचा सर्वांगीण विकास होत आहे. आता फोरममुळे माजी विद्यार्थ्यांनाही पुन्हा एकदा नेतृत्व करण्याची संधी मिळणार आहे. त्याचा त्यांनी नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उपयोग करावा,’’ असे आवाहन नीलम गोऱ्हे यांनी विद्यार्थ्यांना केले.

एखादा उपक्रम सुरू करणे सोपे आहे; परंतु त्यात सातत्य ठेवणे अवघड असते; मात्र ‘यिन’ने गेली सात वर्षे हा मंच उपलब्ध करून महाराष्ट्र घडवण्याचे काम केले आहो, असे कौतुकोद्‍गार गोऱ्हे यांनी काढले. ‘यिन फोरम’मध्ये माजी मुख्यमंत्री संदीप पालवे, अनिकेत मोरे, अजय खांडबहाले, सदस्य कृतिका चौधरी, पालकमंत्री यश देवधर, माजी सभापती आकाश शिंदे, माजी पालकमंत्री दिव्या भोसले आदींचा सहभाग आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: ठाकरे गटानंतर शिंदेसेनेला धक्का, बालेकिल्ल्यातील नगरसेवकाचे पद रद्द

Abu Salem Release Plea : कुख्यात गॅंगस्टर अबू सालेमला सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका ! १९९३ बॉम्बस्फोट प्रकरणात सुटका नाही; याचिका फेटाळली

iPhone 18 India Price: भारत ठरला iPhone 18 खरेदीसाठी जगातील दुसरा सर्वात महागडा देश! अमेरिकेपेक्षा तब्बल 50,000 रुपये जास्त!

“काजोलला कळलं तर मार पडेल…” तब्बूसोबत अजय देवगणची जवळीक पाहून चाहते म्हणाले... Viral Video

Marathi News Live Updates : पालिकेचा विरोध डावलून कॉरिडॉर होणारच; पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या पोस्टने पंढरपुरात राजकीय वातावरण तापले

SCROLL FOR NEXT