ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील sakal
मुंबई

Mumbai : शिवाजी महाराजांना व्यक्ती म्हणून समजून घेण्याची गरज ; ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील

छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला असला तरी त्यांनी मराठा राज्यासाठी संपूर्ण भारताचे नेतृत्व केले होते

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म हा महाराष्ट्रात झाला असला तरी त्यांनी मराठा राज्यासाठी संपूर्ण भारताचे नेतृत्व केले होते. त्यामुळे सह्याद्रीत जन्म झालेल्या या महान राजाचे व्यक्तीमत्व हे हिमालयापेक्षाही उंचीचे होते, त्यामुळे त्यांना एक व्यक्ती म्हणून समजून घेण्याची गरज असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी किताब उत्सवात केले.

नेहरू सेंटर येथे राजकमल प्रकाशन समूहाच्या किताब उत्सवाच्या चौथ्या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज : इतिहासाचे व्याख्यान आणि महासम्राट या विषयावर चर्चासत्रात पाटील बोलत होते. राजकमल प्रकाशनाने पाटील यांच्या महासम्राट या कांदबरीमालाच्या पहिला खंड झंझावातचे हिंदी अनुवादीत महासम्राट पुस्तक काढले असून त्याचा अनुवाद रवी बुले यांनी केला आहे.

या पुस्तकाच्या असंख्य प्रति विक्रीला गेल्या आहेत. त्या पार्श्वभूमीवर नेहरु सेंटर येथे सुरू असलेल्या राजकमल प्रशासन समुहाच्या किताब उत्सवात पाटील यांच्यासोबत रवि बुले यांनी खुली चर्चा केली. त्यावेळी पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे कार्य समजून घेताना त्यांना एक व्यक्ती म्हणून समजून घेण्याची गरज असल्याचे पाटील यांनी सांगितले.

ते मराठा राज्याचे असले तरी त्यांनी संपूर्ण भारतवर्षाचे नेतृत्व केले होते. किताब उत्सवाच्या पहिल्या सत्रात सर ऑर्थर कॉनन डायल यांच्या शरलॉक होम्स या मालिकांच्या पुस्तक संग्रहावर चर्चा झाली. त्यावेळी ज्येष्ठ साहित्यिक संजीव निगम म्हणाले की, "सर ऑर्थर कॉनन डायल यांची जगभरात खरी ओळख ही त्यांच्या शरलॉक होम्स मुळे झाली. त्यांचे ते यश होते. त्या पुस्तकांचा अनुवाद करताना सगळे वास्तव असल्यासारखे आपल्यासमोर ती पात्रे उभी राहायची त्यामुळे त्या रचनांमध्ये एक ताकद होती असेही ते म्हणाले.

दुसऱ्या एका सत्रात ज्येष्ठ लेखिका ममता सिंह यांच्या 'किरकिरी' या कथासंग्रहाचा लोकार्पण सोहळा साहित्यिक असग़र वजाहत यांच्या हस्ते झाला. तर शीना बोरा हत्याकांड वर आधारित संजय सिंह यांनी लिहिलेल्या 'एक थी शीना बोरा' या पुस्तकावर विवेक अग्रवाल यांनी सिंह यांच्यासोबत खुली चर्चा केली.

ते म्हणाले की, सत्य हे पोलिसांच्या चार्टशिटमध्ये आणि प्रेसक्लबमध्ये होणाऱ्या अवांतर चर्चांमध्येही नसते. त्याचे वेगवेगळे पैलू असतात. त्यामुळे मला शीना बोरा प्रकरणात तब्बल १६ हजार पानांचा मजकूर वाचावा लागला. अशी माहितीही त्यांनी यावेळी दिली. अखेरच्या सत्रात शैलजा पाठक यांच्या 'पूरब की बेटियाँ या पुस्तकावर चर्चा झाली त्यात साहित्यिक युनूस खान यांनी सहभाग घेतला होता..

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Rain Update : पुण्यात जोरदार पावसाची अचानक हजेरी, नागरिकांची उडाली तारांबळ; घाटमाथ्यावर सतर्कतेचा इशारा

IND vs ENG 1st T20I: भारत-इंग्लंड मॅच नक्की कुठे पाहायची, Sony की Star Sports? चाहते कन्फ्युज; JioHotstar वाल्याचं काय?

Child Crime: अल्पवयीन गुन्हेगारांना आता सवलत नाही? वयोमर्यादा १८ वरून १६ वर्षांवर आणणार; महाराष्ट्र सरकारचा मास्टरस्ट्रोक

सलमानसोबतच्या ब्रेकअपनंतर ऐश्वर्याला 'त्या' गोष्टीची वाटायची प्रचंड भीती, इतक्या वर्षानंतर झाला खुलासा

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांच्या निलंबनाच्या मागणीसाठी आमरण उपोषण; शिवसेना पदाधिकाऱ्यांचे आंदोलन

SCROLL FOR NEXT