corona update sakal Media
मुंबई

मुंबईकरांसाठी धोक्याची घंटा, धारावीत एकाच दिवशी ३४ कोरोना रुग्ण

सकाळ डिजिटल टीम

मुंबई: कोरोनाची वाढती रुग्णसंख्या आणि तिसऱ्या लाटेची सुरुवात यामुळे सार्वजनिक कार्यक्रमांवर मर्यादा आल्या आहेत. आरोग्य मंत्रालयाच्या बैठकीनंतर राज्यात निर्बंध आणखी कडक करण्यात आले. (New Lockdown Restrictions for in Mumbai)त्यातच आता मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) 31st च्या सेलिब्रेशनसाठी नवी नियमावली जाहीर केली आहे. ओमिक्रॉनचं वाढतं संकट रोखण्यासाठी आणि 31st ला होणाऱ्या पार्ट्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी ही नियमावली जारी करण्यात आली आहे. (Omicron in Mumbai) दुसरीकडे मुंबईतील रुग्णसंख्याही वाढताना दिसून येत आहे.

धारावीमध्ये गेल्या 24 तासांत 34 नवीन कोरोनाचे नवे रुग्ण नोंदवले गेले आहेत. या परिसरातील सक्रिय रुग्णांची संख्या सध्या 95 वर पोहोचली आहे. ही माहिती बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिली आहे. तर दुसरीकडे पुण्यात आज 412 नवीन कोरोनाचे रुग्ण नोंदवले गेले आहेत. सध्या पुण्यातील ऍक्टीव्ह रुग्ण 1,799 आहेत. पुणे महानगरपालिकेने ही आकडेवारी दिली आहे.

मुंबईतील आकडेवारीकडे नजर टाकली तर सध्या धारावीत ३४ प्रकरणे असून एकूण रुग्णसंख्या ७२७३ वर पोहोचली आहे. दादरमध्ये ८७ रुग्ण सापडले असून एकूण १०७६० रुग्णसंख्या झाली आहे. तर माहिममध्ये ७३ रुग्ण सापडले असून ११०५० वर रुग्णसंख्या पोहोचली आहे. एकूण आज १९४ रुग्ण सापडले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

SA vs ZIM: कसोटी क्रिकेटला मिळावा नवा 'त्रिशतकवीर'! द. आफ्रिकेच्या कर्णधाराने गोलंदाजांना झोडपत नोंदवले वर्ल्ड रेकॉर्ड

Stock market News : ‘MRF’ स्टॉकशी पुन्हा बरोबरी केली ‘या’ शेअरने! ; 3 रुपयांवरून थेट 300000 पर्यंत वाढली होती किंमत अन् आता...

राम कपूरच्या 'मिस्त्री' मध्ये झळकतोय मराठमोळा अभिनेता; मराठीत दिलाय कोट्यवधींचा सिनेमा

Latest Maharashtra News Updates : नाशिकमध्ये गोदावरीच्या पाणी पातळीत वाढ

Thane News: धावत्या स्कूल व्हॅनच्या डिक्कीतून विद्यार्थी पडले, दोन मुले गंभीर जखमी; ठाण्यातील धक्कादायक घटना

SCROLL FOR NEXT