मुंबई

मुंबईकरांनो सज्ज राहा! आज मुंबईत तुफान पाऊस होण्याची शक्यता

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : राज्यात मान्सून दाखल होऊन दोन दिवस झालेत. अशातच आज मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने आज मुंबईमध्ये मान्सून दाखल होईल, असा अंदाज वर्तवला आहे. यात आज मुंबई-ठाण्यासह उपनगर, पालघर आणि पुण्यात मुसळधार पाऊस होईल असा इशारा देण्यात आला. दरम्यान शनिवारी रात्रीपासून ठाण्यासह उपनगरांमध्ये पाऊस सुरू आहे.

कोकण, अहमदनगर आणि मराठवाड्यातील काही भागांमध्ये पावसानं हजेरी लावली. त्यानंतर ढगांचा गडगडाट आणि वीजाही चमकल्या आणि मुंबईकरांना मान्सूनच्या आगमनाची चाहूल मिळाली. शनिवारी संध्याकाळी उपनगरांमध्ये पावसाने हजेरी लावली.

सोमवारपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्रात सक्रिय होईल असं हवामान विभागाकडून सांगण्यात येत आहे. शनिवारी संध्याकाळी डोंबिवली, कल्याण, वाशी, घणसोली, कुर्ला, चेंबूर अशा काही ठिकाणी 20 मिलीमीटर किंवा त्याहून अधिक पावसाची नोंद झाली. 

बोरिवली, दहिसर येथेही रिमझिम पाऊस झाला. शनिवारी मान्सूनने मध्य महाराष्ट्रातील काही भाग, मराठवाडा आणि विदर्भाचाही बराचसा भाग व्यापला. मान्सूनची प्रगतीचा अंदाज घेऊन आज मुंबईसह उर्वरित भागामध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.

असा असेल यंदाचा पाऊस, हवामान विभागाचा अंदाज 

यावर्षी सरासरी इतका पाऊस पडणार असून जून ते सप्टेंबर महिन्यात सरासरीच्या 96 ते 100 टक्के पाऊस पडणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. एप्रिल महिन्यात आयएमडीने यंदाच्या मान्सूनबाबत पहिला अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार यंदा मान्सून सामान्य राहणार आहे. यंदा पाऊस सरासरीच्या 100 टक्के पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला. 

निसर्ग चक्रीवादळाचा फटका 

निसर्ग चक्रीवादळामुळं अनेक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. हे वादळ कोकण किनारपट्टीवर धडकलं. या चक्रीवादळाचा फटका अलिबाग, श्रीवर्धन, मुरुड, दिवेआगर या तालुक्यांना जोरदार बसला. या चक्रीवादळानं दिशा बदलल्यानं मुंबईवरील संकट टळलं मात्र तरी या वादळाचा फटका मुंबईलाही बसला. मुंबईतही जोरदार पावसानं हजेरी लावली होती. त्यावेळी या मान्सूनपूर्व पावसामुळं मुंबईच्या सखल भागांत पाणी साचलं होतं. जोरदार पाऊस आणि सोसाट्यांचा वाऱ्यामुळे मुंबईत 100 हून जास्त झाडं कोसळण्याचीही घटना घडल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Abu Azmi Vs MNS : Video - ‘’रिक्षावाले, फेरीवाल्यांना काय मारता, मारायचंच आहे ना, तर..’’ ; अबू आझमींनी ‘मनसे’ला ललकारलं!

IND vs ENG 2nd Test: शुभमनच्या २६९ धावा अन् नंतर आकाश दीपचा भेदक मारा! इंग्लंडच्या संघाची घरच्या मैदानावर झालीय वाईट अवस्था

IND vs ENG 2nd Test : शुभमन गिल OUT होताच इंग्लंडच्या चाहत्यांनी काय केलं? विश्वास बसणार नाही, Video Viral

Chicago Firing: रेस्टॉरंटबाहेर बेछूट गोळीबार; ४ जणांचा मृत्यू, १४ जण जखमी, घटनेचा थरारक व्हिडिओ व्हायरल

Nitin Gadkari flight emergency landing : मोठी बातमी! आता नितीन गडकरींच्या विमानाचे झाले इमर्जन्सी लँडिंग; जाणून घ्या, नेमकं काय घडलं...?

SCROLL FOR NEXT