मुंबई

कोरोनाचा आकडा अकराशे पार; आज मुंबईत 1144 नवे रुग्ण, तर 17 मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई, ता. 25 : आज मुंबईत 1144 नवे रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,78,590 झाली आहे. तर आज 17 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 10,723 वर पोचला आहे. आज 701 रुग्ण बरे झाले असून आतापर्यंत 2,53,604 रूग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 91 टक्के इतका झाला आहे.

मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 206 दिवसांवर गेला आहे. तर 24 नोव्हेंबरपर्यंत एकूण 18,17,232 कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 18 नोव्हेंबर ते 24 नोव्हेंबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 0.34 इतका आहे.

मुंबईत आज नोंद झालेल्या 17 मृत्यूंपैकी 14 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये  8  पुरुष तर 9  महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या सर्व रुग्णांचे वय 60 वर्षांवर होते. 

मुंबईत 401 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 4,722 इतकी आहे. बाधित रूग्णांच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 6,631 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड कोळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 454 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. 

mumbais covid count crosses mark of one thousand one hundred after drop to five hundred

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

12 वर्षांच्या निष्ठेचा सन्मान! जातेगावचे कैलास उगले ठरले मानाचे वारकरी; आषाढी एकादशीला मुख्यमंत्र्यांसोबत शासकीय महापूजेचा मिळाला मान

Ashadhi Ekadashi : 'ज्ञानोबा माऊली'च्या गजरात CM देवेंद्र फडणवीस अन् अमृता फडणवीस यांनी धरला फुगडीचा फेर; पारंपरिक वेशात घेतला सहभाग

Ashadhi Ekadashi 2025 Live Updates : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विठ्ठल मंदिरात दाखल, महापूजेला सुरुवात

MK Stalin Reaction : ठाकरे बंधूंच्या मेळाव्यावर आता CM स्टॅलिन यांचीही आली प्रतिक्रिया; केलंय मोठं विधान!

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

SCROLL FOR NEXT