मुंबई

मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी

मुंबईकरांना दिलासा देणारी बातमी

दीनानाथ परब

मुंबई: मुंबईकरांसाठी (Mumbaikars) एक चांगली बातमी आहे. मुंबईत कोरोना रुग्णंची (corona patient) संख्या कमी होतच आहे. पण त्याचबरोबर आता पॉझिटिव्हिटी रेटही (Mumbais covid positivity rate)अजून खाली आला आहे. मुंबईचा कोविड पॉझिटिव्हिटी रेट ८.६ टक्क्यांपर्यंत खाली आला आहे. गुरुवारी एकूण ३२ हजार २२४ कोविड चाचण्या करण्यात आल्या. त्यात ३,०३० रुग्णांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले. मुंबई बाहेरुन जे रुग्ण आलेत, त्यांना वगळल्यास पॉझिटिव्हिटी रेट अजून खाली जाईल, असे महापालिका अधिकाऱ्यांनी सांगितले. (Mumbais covid positivity rate drop to 8.6 percent)

मुंबई महापालिकेवर चाचण्या कमी केल्याची टीका होत असताना पॉझिटिव्हिटी रेट कमी झाल्याची बातमी आली आहे. मार्च २०२० पासून आम्ही ठराविक लक्ष्य निश्चित करुन, कोरोना चाचण्या करत आहोत, असे अतिरिक्त महापालिका आयुक्त सुरेश काकानी यांनी सांगितले. सरसकट सर्वांची चाचणी करण्याऐवजी जे लोक हाय रिस्क कॉन्टॅक्ट मध्ये आहेत. त्याशिवाय अत्यावश्यक सेवांमधील नागरिकांना व्हायरसची लागण होण्याचा धोका असतो, अशा चाचण्यांवर महापालिकेने भर दिला आहे.

"लॉकडाउनमुळे मॉल, रेल्वे स्थानके अशा ठिकाणी आता गर्दी नाहीय. चाचण्या कमी होत असल्या, तरी पॉझिटिव्हिटी रेटही घटतोय" असे सार्वजनिक आरोग्य विभागातील डॉक्टरने सांगितले. आठड्याभरापूर्वी ३० एप्रिलला मुंबईचा पॉझिटिव्हिटी रेट ९.९ टक्के होता. तेच ३ एप्रिलला पॉझिटिव्हिटी रेट ३० टक्के होता. कुठल्याही साथीच्या आजाराचा हा स्वभावाच असतो. आधी शिखरापर्यंत जाऊन रुग्णसंख्या खाली येते. देशातील अन्य भागात पॉझिटिव्हिटी रेट अजून शिखरावर पोहोचलेला नाही. सात मे ला गोव्याचा पॉझिटिव्हिटी रेट ४१ टक्के होता. मुंबईत सर्वच वॉर्डसमध्ये कोविड पॉझिटिव्हिटी रेट कमी होतोय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: दसऱ्यापूर्वी सोन्याचे भाव कोसळले! एकाच दिवसात तब्बल 25 हजारांनी घसरण; आजचा 10 ग्रॅमचा भाव पाहा

Solapur Edible Oil: खाद्यतेलाच्या दरात मोठी घट; सोलापूर बाजारात सूर्यफूल, सोयाबीन, पाम तेल प्रतिकिलो ५ रुपयांनी स्वस्त

Latest Marathi News Live Update : सोलापुरात चारा वाहतुकीवर निर्बंध! जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

IND vs AFG Asian Games: एकही चेंडू न खेळता भारत उपांत्य फेरीत; अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात नेमकं काय घडलं? नियम काय सांगतो?

छटपूजेनिमित्त परराज्यांसाठी ४१८ विशेष गाड्या, लोकल प्रवासी वाऱ्यावर; मध्य रेल्वेच्या दुटप्पीपणाविरोधात प्रवासी आक्रमक

SCROLL FOR NEXT