मुंबई

मुंबईची कॉलर टाईट ! धारावी पॅटर्नचा जगभरात डंका, आता फिलिपिन्सने मागवली ब्लु प्रिंट..

समीर सुर्वे

मुंबई : कोविड विरोधातील धारावी पॅटर्न आता फिलीपाईन्स देशातील वस्त्यांमध्येही राबविण्यात येणार आहे. फिलीपाईन्सच्या आरोग्य विभागाने मुंबई महानगर पालिकेकडून धारावी पॅर्टनची ब्ल्यू प्रिंट घेतली असून लवकरच तेथेही "चेस द व्हायरस ही मोहिम सुरु होण्याची शक्‍यता आहे.

झोपडपट्टीतील उद्योगनगरी म्हणून धारावीची ओळख जगात आहे. मात्र या अक्राळ विक्राळ पसरलेल्या आणि दाटीवाटीच्या वस्तीतील कोविड प्रतिबंधासाठी केलेल्या कामगिरीची दखलही जागतिक आरोग्य संघटनेसह जगाने घेतली आहे. आता फिलीपाईन्सच्या आरोग्य विभागाने महानगर पालिकेशी संपर्क साधून धारावीत केलेल्या उपाययोजनांची माहिती घेतली होती. त्यानुसार आता तेथील झोपडपट्ट्यांमध्येही "चेस द व्हायरस' ही मोहिम राबविण्यात येणार आहे. फिलीपाईन्स आरोग्य विभागाचे पथकही तेथील वस्त्यांमध्ये घरोघरी जाऊन संशयीत रुग्णांचा शोध घेणार आहेत.

फिलीपाईन्स मध्येही भारताप्रमाणे मोठ्या प्रमाणात झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्ट्यांमध्येही कोविडचा प्रार्दुभाव झाला असून संसर्ग हाताबाहेर जाऊ लागल्याने त्यांच्या सरकारने धारावी पॅटर्न राबविण्याचा निर्णय घेतला आहे.

फिलीपाईन्स सरकार धारावी मॉडलचा वापर करणार आहे. मुंबई महानगर पालिकेने जगाला कोविडविरोधी लढ्याचा मार्ग दाखवला आहे. 'चेस ते व्हायरस' या मोहिमेचे हे यश आहे. मुंबईत आता रुग्णवाढीचा दर 0.8 टक्‍क्‍यांवर आला आहे. तर 81 टक्के रुग्णांना रुग्णालयातील डिस्चार्ज मिळाला आहे.रुग्ण दुप्पट होण्यचा कालवधी ही 86 दिवसांवर पोहचला आहे

- इक्‍बाल सिंह चलह,महापालिका आयुक्त

धारावीमध्ये लॉकडाऊन करणे ,सोशल डिन्संसिंग पाळणे शक्‍य नव्हते. त्यामुळे पालिकेच्या जी उत्तर प्रभागाचे सहाय्यक आयुक्त किरण दिघावर यांनी पालिकेच्या आरोग्य विभागाचे डॉक्‍टर, कर्मचारी आणि आरोग्य सेविकांच्या मादतीने संशयीत रुग्ण शोधण्यास सुरवात केली. त्यांना विविध संस्था, खासगी डॉक्‍टरांचीही साथ मिळाली. या भागातील जवळ जवळ प्रत्येक व्यक्तीची प्राथमिक तपासणी करण्यात आली होती. त्यात संशयीत रुग्ण आढळल्यास त्यांची चाचणी करण्यात आली. त्यातून कोविडचा संसर्ग होण्यापुर्वीच रुग्ण सापडू लागले. तसेच, हायरीस्क आणि लोरिस्क व्यक्तींच्या विलगीकरणालाही प्राधान्य देण्यात आले.सार्वजिनक स्वच्छतागृहांचे ठराविक वेळेनंतर निर्जंतुकीकरण केले जात होते.

( संपादन -  सुमित बागुल ) 

mumbais dharavi covid pattern will be used in Philippines to get rid of covid 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT