मुंबई

मुंबईत रुग्णवाढीचा दर 1 टक्क्यांवर; दिवसभरात 1,620 नवे रुग्ण तर 36 मृत्यू

मिलिंद तांबे

मुंबई : मुंबईत आज 1,620 रुग्ण सापडले असून मुंबईतील एकूण रुग्णसंख्या 2,31,070 झाली आहे. मुंबईत आज 36 रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांचा आकडा 9,466 वर पोचला आहे. मुंबईत आज 1,968 रुग्ण बरे होऊन घरी गेले. रुग्ण बरे होण्याचा दर हा 84 टक्के इतका झाला आहे.

बाधित रूग्णांच्या संपर्कात येणा-या व्यक्तींची संख्या दिवसेंदिवस वाढत असून गेल्या 24 तासात बाधित रुग्णांच्या संपर्कात 15,301 अति जोखमीचे व्यक्ती आले आहेत. त्यामुळे कोविड काळजी केंद्रात दाखल कऱण्यात येणा-यांची संख्या देखील वाढत असून आज कोविड काळजी केंद्र 1 मध्ये 1,144 अति जोखमीचे संपर्क उपचारासाठी दाखल करण्यात आले. मुंबईत 652 इमारती आणि झोपडपट्टया कंटेन्मेंट झोन म्हणून जाहीर करण्यात आले असून सक्रिय सीलबंद इमारतींची संख्या 9,872 इतकी आहे. 


मुंबईत आज नोंद झालेल्या 36 मृत्यूंपैकी 30 जणांना दीर्घकालीन आजार होते. आजच्या एकूण मृत्यू झालेल्या व्यक्तींमध्ये 28 पुरुष तर 8 महिलांचा समावेश होता. एकूण मृत झालेल्या 36 रुग्णांपैकी एकाचे वय 40 च्या खाली होते.  7 रुग्ण 40 ते 60 वर्षा दरम्यान होते तर 28 रुग्णांचे वय 60 वर्षा वर होते.                 

आज 1,968 रुग्ण बरे झाले असून आज पर्यंत 19,5773 रुग्णांना घरी सोडण्यात आले. मुंबईत रुग्ण दुपटीचा दर 69 दिवसांवर गेला आहे. तर 11 ऑक्टोबर पर्यंत एकूण 12,71,087  कोविड चाचण्या करण्यात आल्या. तर 5 ऑक्टोबर ते 11 ऑक्टोबर दरम्यान कोविड रुग्णवाढीचा दर 1.00 इतका आहे. 

----------------------------------------------

( संपादन - तुषार सोनवणे )

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CNG दरवाढीचा नवा धक्का! गेल्या ११ दिवसांतील ही चौथी वाढ... मुंबई-पुण्यात दर किती?

'तो संपूर्ण रात्र दुसऱ्या महिलेसोबत राहिला तरी...' तबिंदा सनपाल नवऱ्याबद्दल बोलताना म्हणाली...'तो दर दिवाळीत तीन किलो सोनं देतो'

Chandgad Drowning Child : आजीच्या निधनामुळे गावी गेल्या अन् तीन शाळकरी मुलींचा शेततळ्यात बुडून मृत्यू, चंदगडमधील घटना; लहान भावाचे प्रयत्न असफल...

Buldhana Tragedy: पत्नीशी वादानंतर टोकाचे पाऊल! चार चिमुकल्यांना विहिरीत ढकलून पित्याने जीवन संपवले, बुलडाण्यात काळजाचा ठोका चुकवणारी घटना

Maharashtra Accident: सोमवार ठरला ‘अपघातवार’; एकच दिवशी १४ जणांचा मृत्यू, आंबेनळीत मोटार कोसळून आठ तर तिहेरी अपघातात सहा जणांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT