born baby 
मुंबई

Lockdown : ...अन् तिने रस्त्यावरच दिला बाळाला जन्म

सकाळवृत्तसेवा

ठाणे : रुग्ण कोणताही असो,  त्याला कोणत्याही आजारावर उपचार करण्यापूर्वी कोविड-19 टेस्ट करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यात कोविडची खासगी रुग्णालयात टेस्ट करणे हे सर्वसामान्य नागरिकांच्या आवाक्या बाहेर असल्याने याचाच फटका मुंब्र्यातील एका गरोदर महिलेला बसला आहे. कोविड टेस्ट करण्यासाठी पैसे नसल्यामुळे कळवा रुग्णालयाकडे जाण्यासाठी गाडीच्या प्रतीक्षेत असतांना या महिलेची रस्त्यावरच प्रसूतकी झाल्याची घटना घडली. यावेळी एका नर्सिग  हॉस्पिटलच्या डॉक्टरने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेवून  तिची सुखारु प्रसूती केली. दरम्यान आई व नवजात बाळाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टर इम्रान यांनी दिली. 

कोणत्याही आजारावर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी कोविड टेस्ट करून घेणे अनिवार्य असल्याच्या सूचना सर्व रुग्णालयांना आरोग्य विभागाच्यावतीने देण्यात आल्या आहेत. त्यात शुक्रवारी (ता. 22) मुंब्रा येथील रशीद काम्पउंड येथे राहणारी एक गरोदर महिला पती सोबत तिची नोंद असणाऱ्या रुग्णालयात गेली. यावेळी कोविड टेस्ट करणे बंधनकारक असल्याचे त्यांना सांगण्यात आले.

मात्र संबधित महिलेची परिस्थिती हलाखीची असल्याने ही टेस्ट करणे त्यांना परवडणारे नव्हते. त्यामुळे त्यांनी पालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाण्याचा निर्णय घेतला. मात्र गाडीची प्रतीक्षा करत असतानाच महिलेला प्रसूती पूर्व कळा येवू लागल्या व तिची रस्त्यावरच प्रसूती झाली. ही बाब रस्त्यावरून जाणाऱ्या अन्य लोकांच्या लक्षात येताच ते तिला शेजारी असणाऱ्या नर्सिंग होममध्ये घेऊन गेले त्यानंतर त्याठिकाणी महिलेची सुखरूप प्रसूती केली. तिने एका गोंडस मुलाला जन्म दिला. विशेष म्हणजे ही प्रसूती करणाऱ्या डॉ. इम्रान यांनी कोणतीही फी देखील घेतली नसून मोफत उपचार करीत माणुसकीचे दर्शन दिले.

In Mumbra, a woman gave birth on the street Both safe due to the circumstances of the citizens

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Suryavanshi इंग्लंडविरुद्ध विश्वविक्रमी शतक केल्यानंतर शुभमन गिलचं नाव घेत म्हणतोय, आता लक्ष्य २०० धावा; VIDEO

Crime News: "ऐका! आता मी शारीरिक संबंध ठेवणार नाही, माझ्या नवऱ्याला...", प्रियकर मानलाच नाही शेवटी असा धडा शिकवला की...

Thane Politics: पुलाचे घाईत उद्घाटन, चालकांचा जीव धोक्यात, गुन्हा दाखल करा; ठाकरे गट आक्रमक

संतापजनक घटना! 'फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून महिलेवर अत्याचार'; उरुळी कांचन पोलिसांकडून दोघांना अटक

Pune Accident: 'आषाढी एकादशी दिवशीच पती-पत्नीचा अपघाती मृत्यू'; वारीवरून परतत असताना काळाचा घाला, परिसरात हळहळ

SCROLL FOR NEXT