Mumbai Pollution sakal
मुंबई

Mumbai Pollution: मुंबईचे प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका लागली कामाला; ८६८ बांधकाम थांबवली

BMC: बांधकामांना परवानगी दिलेल्या बहुतांश साईट्सवर त्या नियमावलीचे पालन केले जात नसल्याचे निरर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेने कारवाई सुरूच ठेवली आहे.

सकाळ डिजिटल टीम

Mumbai Pollution: मुंबईत प्रदुषण वाढतच आहे. प्रदूषण मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन करणाऱ्या बिल्डरांविरूध्द पालिकेची कारवाई सुरूच असून आतापर्यत 2955 बांधकामांना नोटीसा पाठविल्या असून 868 बांधकामे थांबविण्यात आल्याची माहिती पालिका प्रशासनाने दिली.

बांधकामांमुळे मुंबई महानगरासह मुंबई प्रदेशातील हवेच्या गुणवत्तेवर विपरित परिणाम होत असल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वायू प्रदूषण नियंत्रणासाठी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने गेल्या २५ ऑक्टोबर रोजी मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आली आहेत. सर्व संबंधित यंत्रणांसाठी ही मार्गदर्शक तत्वे अनिवार्य असून त्यांचे अत्यंत काटेकोरपणे केले जावे.

याबाबत कोणत्याही प्रकारची अनियमितता आढळून आल्यास संबंधितांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी वेळोवेळी दिलेले आहेत. मुंबई परिसरात सुरू असलेल्या सर्व बांधकाम व्यवसायिक, शासकीय, निमशासकीय आस्थापनांनी प्रदूषणविषयक नियमावलींचे काटेकोरपणे पालन करावे अन्यथा त्यांच्यावर कठोर कार्यवाही करण्यात येईल असे पालिका प्रशासनाने बजावले आहे.

मुंबईत मोठ्या प्रमाणात बांधकामे सुरू आहेत. शहर आणि उपनगरातील सुमारे 6 हजार बांधकामांना पालिकेने परवानगी दिली आहे. मोठ्या प्रमाणात सुरू असलेल्या बांधकामांमुळे हवेचा दर्जा खालावला असल्याचे निदर्शनास आले आहे. बांधकामांना परवानगी दिलेल्या बहुतांश साईट्सवर त्या नियमावलीचे पालन केले जात नसल्याचे निरर्शनास आले आहे. त्यामुळे पालिकेने कारवाई सुरूच ठेवली आहे.

प्रदुषण नियमावलीची पायमल्ली करणा-या 868 बांधकामांचे काम धांबविण्यात आले आहे. तर 2955 बांधकामाच्या साईट्सना नोटीसा पाठविल्या असल्याची समजते. 603 बांधकामांना कारणे दाखवा नोटीसा पाठविल्या असल्याची माहिती पालिकेने दिली. धुळीमुळे होणारे प्रदुषण रोखण्यासाठी बांधकामांच्या ठिकाणी ताडपत्री लावली जात नसल्याचे आढळून आले आहे. डेब्रिज टाकलेल्या 254 प्रकरणांमध्ये 16.3 लाख रुपये दंड करण्यात असल्याची माहिती पालिकेने दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Trump Buffalo Sacrifice: ‘ट्रम्प’ नावाच्या म्हशीची कुर्बानी शेवटच्या क्षणी रोखली! गृह मंत्रालयाला करावा हस्तक्षेप लागला, प्रकरण काय?

Scorpio कारमध्ये माजी सरपंचासह 4 जणांना जिवंत जाळलं; दुमडलेली सीट, रक्तानं माखलेली आगपेटी अन् विटांवर रक्ताचे डाग.., घातपाताचा संशय बळावला!

Kolhapur Crime : शेतात कामासाठी गेलेल्या महिलेवर अतिप्रसंग, शरीरसुखास नकार दिल्याने निर्घृण खून; खिशावरील 'त्या' डागाने उलगडलं धक्कादायक रहस्य

Pune News : पुणे शहरात सिमेंट काँक्रिट उखडले; रस्त्यावर पुन्हा खड्डे

Pali Census : 40 ते 42 अंश सेल्सिअस तापमानात 'सुपरहिरो' बनून फिरतायत शिक्षक; उन्हाच्या लाहीलाहीतही जनगणनेचे राष्ट्रीय कर्तव्य अविरत सुरू

SCROLL FOR NEXT