corona survey 
मुंबई

पालिकेच्या कोरोना सर्व्हेमुळे शेजारी पाहतायेत एकमेकांकडे संशयाने

सकाळवृत्तसेवा


ठाणे ः कल्याण-डोंबिवलीतील कोरोना बाधित रुग्णांचा आकडा 73 वर गेला असून डोंबिवलीतील रुग्णांचा त्यात समावेश जास्त असल्याने भितीपायी डोंबिवलीकरांच्या मनाचा नुसता गोंधळ उडाला असल्याचे दिसून येते. कोरोना बाधित रुग्ण विभागात सापडताच आजूबाजूच्या सोसायट्या, घरांचा सर्व्हे कधी करणार,  हा कोणता सर्व्हे होता, आमच्याकडे तर अद्याप सर्व्हे झालेला नाही, कधी येणार पालिकेचे कर्मचारी सर्व्हेला असे अनेक प्रश्न येथील नागरिक विचारत असून या सर्व्हेमुळे नागरिकांच्या गोंधळात भर पडत आहे.

 विभागात सर्व्हे होताच काही घरांतील नागरिकांनी तर भितीपायी आजूबाजूचा संपर्कच तोडल्यासारखे वागत आहेत. यामुळे शेजारधर्मातही वितुष्ट निर्माण होत असल्याचे पहायला मिळत आहे.  कल्याण डोंबिवली क्षेत्रात शनिवारी 13 कोरोना बाधित रुग्ण आढळून आले यातील 12 रुग्ण हे डोंबिवलीतील आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी मानपाडा रोडवरील आयकॉन रुग्णालयात कोरोनाबाधित चार रुग्ण सापडल्याने तसेच त्यांच्या संपर्कात आलेल्या 13 कर्मचाऱ्यांना विलगीकरण कक्षात हलविण्यात आले आहे.

डोंबिवलीतील मानपाडा रोड, नांदिवली रोड परिसरातील नागरिकांच्या मनात देखील भीतीचे वातावरण आहे. आयकॉन रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त परिसरात पसरताच नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.


नागरिकांच्या तक्रारी
विभागात कोरोनाबाधित रुग्ण सापडल्यास त्या विभागाचा पालिका आरोग्य विभागाकडून सर्व्हे केला जात आहे. परंतू हे सर्व्हे करणारे कर्मचारी सर्वच घरांपर्यंत पोहोचत नसल्याच्या तक्रारी आयरे गाव, म्हात्रे नगर परिसरातील नागरिकांनी केल्या आहेत. या भागात कोरोनाचे रुग्ण सापडत असून 40 ते 50 नागरिक क्वारंटाईन असल्याचे समजताच काही नागरिकांनी त्याचा धसकाच घेतला आहे.

municipal start corona surve in domibivali  pepole are scared 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Anti paper leak bill: विरोधकांचा सभात्याग अन् 'पेपरफुटी'विरोधी विधेयक राज्यसभेत मंजूर; अंतिम मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवले जाणार

Phule Wada Memorial Delay: फुले वाडा व सावित्रीबाई फुले स्मारकाचे काम संथ; छगन भुजबळ यांची पुणे महापालिकेवर कडक टीका

Pune Police Misconduct: तपासाऐवजी पर्यटन; विश्रामबागेतील तीन पोलिसांवर कारवाई, दोन वर्षे वेतनवाढ रोखली

VSI Land Approval: जालन्यात व्हीएसआयला अतिरिक्त जमिनीला शासनाची मंजुरी; सौरऊर्जा प्रकल्प, पंपगृह व ऊस रोप निर्मिती उपक्रमांना वेग

Pune Civic Alert: अमित शहांच्या पुणे दौऱ्यापूर्वी महापालिका सतर्क; ताफ्याच्या मार्गावरील रस्ते खड्डेमुक्त करण्याचे आयुक्तांचे आदेश

SCROLL FOR NEXT