Murder sakal
मुंबई

पत्नीने मुलीसोबत केली पतीची हत्या; लग्नावरून व्हायचे वाद

बोरसे यांच्या मुलीचे लग्न झाले होते. परंतु, तिला पतीसोबत राहायचे नव्हते

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : जिल्ह्यातील कल्याण शहरात ४५ वर्षीय महिलेने २६ वर्षीय मुलीसह ५५ ​​वर्षीय पतीची हत्या (Murder) केली. मुलीच्या लग्नावरून कुटुंबात रोज भांडणे होत होती. कोळसेवाडी पोलिसांनी शुक्रवारी महिला व मुलीला अटक केली. प्रकाश बोरसे असे मृताचे नाव असून, ते हवालदार म्हणून कार्यरत होते.

बोरसे यांच्या मुलीचे लग्न झाले होते. परंतु, तिला पतीसोबत राहायचे नव्हते. यामुळे ती घटस्फोटाची मागणी करीत होती. मात्र, वडील तिला जाण्यासाठी सांगत होते. गुरुवारी पत्नी ज्योती आणि मुलगी भाग्यश्री पवार रात्री जेवण बनवताना बोरसे यांनी पुन्हा मुलीच्या लग्नाबाबत बोलणे सुरू केले आणि त्यांच्यात वाद झाला. यातच पत्नी व मुलीने प्रकाश बोरसे यांची हत्या (Murder) केली.

शेजाऱ्यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सांगितले की, प्रकाश आणि कुटुंबीयांमध्ये मुलीला सासरी पाठवण्यावरून वाद झाला होता. यावर संतापलेल्या पत्नी ज्योतीने लोखंडी सळईने प्रकाश यांच्या डोक्यावर हल्ला केला. सोबतच मुलीनेही वडिलांना मारहाण सुरू केल्याने ते बेशुद्ध झाले. बोरसे यांना आरोपी आणि शेजाऱ्यांनी रुग्णालयात नेले. परंतु, डॉक्टारांनी त्यांना मृत घोषित केले, असे कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक किसन गवळी यांनी सांगितले. पोलिसांनी दोन्ही महिला आरोपींना आयपीसी ३०२ अंतर्गत अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG सिलिंडरच्या मुद्यावर सरकारने केले हात वर? नागरिकांना विकल्प शोधण्याचे आवाहन, नेमकं काय सांगितलं?

Iran War : अमेरिका-इराण युद्धामुळे इंग्लंडचे क्रिकेट खेळायचे झालेत वांदे! Dukes Ball चा तुटवडा अन् गगनाला भिडल्या किमती...

World Sparrow Day : ‘या चिमण्यांनो परत फिरा रे…’ शहरातून हरवलेली चिऊताई पुन्हा कशी येईल?

राज्य सहकारी बँकेची ‘थकबाकी निवारण योजना २०२६’ जाहीर; हजारो कोटींच्या कर्ज निपटाऱ्याला गती

Latest Marathi News Live Update : लोणावळा नगरपरिषदेत तणाव; नगराध्यक्षांनी मुख्य अधिकाऱ्यांच्या कॅबिनला ठोकले टाळे...

SCROLL FOR NEXT