मुंबई

सासराच होता मास्टरमाइंड, आक्सा बीचवर सापडलेल्या मृत महिलेच्या खुनाचं गुढ उलगडलं

राजू परुळेकर

अंधेरी : मालवणी पोलिस ठाण्याच्या हद्दीत 24 डिसेंबर रोजी आक्सा बीचवर सापडलेल्या 20 ते 35 वर्षाच्या महिलेच्या बेवारस महिलेच्या मृत्यूचे गुड अखेर मालवणी पोलिसांनी उकलले. या प्रकरणी मालवणी पोलीस ठाण्यात बेवारस मृतदेहाची नोंद करण्यात आलेली होती. तर समता नगर पोलिस ठाण्यात महिलेच्या हरविल्याची तक्रारही दाखल होती. 

मालवणी पोलिसांना महिलेचा मृतदेह हा गोणीत कुजलेल्या अवस्थेत सापडला होता. पोलिसांना शवविच्छेदनाच्या आवाहलात मृत्यू श्वास गुदमरल्याने झाल्याचे समोर आले. तर मृत्यूही तीन दिवसापूर्वी झाल्याचे समोर आल्यानंतर मृतदेहाची ओळख पटली आणि तपासाला सुरुवात झाली. सदर गुन्ह्याप्रकरणी मृत महिलेच्या सासऱ्याकडे कसून चौकशी केल्यानंतरसत्य बाहेर पडले. आपल्या मुलाने प्रेमविवाह केल्याने सासऱ्याला खूप त्रास झाला होता. तर सासर्यांकडून महिलेच्या चारित्र्यावरही संशय घेतला जात होता. 

दरम्यान 9 डिसेंबर रोजी रात्री 1.30 वाजताच्या सुमारास सासऱ्याने दोन साथीदारांच्या सहाय्याने बिहारी टेकडी, कृष्ण गोपाळ चाळ, बिहारी समिती ऑफिसच्या शेजारी पोईसर पूर्वमध्ये कांदिवली येथे पोहचले. त्यावेळी मृतक महिला झोपलेली होती. सासरा आणि सहकार्यांनी तिचे हातपाय धरून तिच्या तोंडावर उशी दाबून तिचा खून केला आणि मृतदेह गोणीत भरून नाल्यात फेकून दिला असल्याची कबुली महिलेच्या सासऱ्याने दिली. याबाबत अधिक तपास पोलिस करीत आहेत.

murder mistery solved by mumbai police after demised women found on aksa beach 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Beed Crime: अल्पवयीन विवाहितेवर अत्याचार करुन खांबाला बांधलं; लोकांनी सोडवण्याऐवजी व्हिडीओ शूट केले

Prakash Ambedkar : एपस्टिन प्रकरणाबाबत संघाला जाब विचारणार; २३ मार्चला नागपुरात आंदोलन

Railway Ticket Booking: 'रेलवन' ॲपचा ‘डिजिटल’ गोंधळ! पैसे वजा होऊनही तिकीट गायब; अधिकाऱ्याकडे तक्रार केली पण...

अखेर 'त्या' शिक्षकावर गुन्हा दाखल; विद्यार्थिनीला मारहाण केल्याचं प्रकरण; 'सकाळ'ने घटना आणली होती समोर

Yavatmal Crime : जुन्या वादातून तरुणाचा खून; आरोपी अटकेत

SCROLL FOR NEXT