Murder of a teacher for money by a student 
मुंबई

सातवीतील विद्यार्थ्याकडून पैशांसाठी शिक्षिकेची हत्या

सकाळ वृत्तसेवा

मुंबई - सातवीतील १२ वर्षांच्या विद्यार्थ्याने शिकवणी घेणाऱ्या शिक्षिकेची पैसे न दिल्याने झालेल्या भांडणातून घरात घुसून चाकूने वार करत हत्या केल्याची घटना गोवंडी येथील शिवाजीनगर परिसरात घडली. घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी मुलाची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात केली.  

आयशा अस्लम हुसैया (वय ३०) असे या मृत शिक्षिकेचे नाव आहे. गोवंडी परिसरातील शिवाजीनगर येथे राहणाऱ्या या शिक्षिकेचा घटस्फोट झाला होता. त्यांच्यासोबत एक मुलगा राहत असून, दुसरा मुलगा त्यांच्या पतीसोबत राहतो. आयशा यांच्या वडिलांनी मुलीच्या नावे सुरु केलेल्या संस्थेच्या शाळेत त्या शिक्षिका म्हणून नोकरी करत. त्यासोबतच त्या खासगी शिकवणीही घेत. आरोपी विद्यार्थीही त्यांच्याकडे शिकवणीसाठी यायचा.  

सोमवारी रात्री ८ वाजता शिकवणी सुटल्यावर आरोपी पुन्हा आयशा यांच्याकडे आला. शिकवणीच्या पैशावरून त्यांच्यात वाद झाला. त्यातूनच आरोपीने त्यांच्या पोट आणि पाठीवर हल्ला केला. त्यानंतर जखमी अवस्थेतील आयशा यांना शेजाऱ्यांनी शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयात नेण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला, अशी माहिती पोलिसांनी दिली. पोलिसांना आरोपीची रवानगी डोंगरी येथील बालसुधारगृहात केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RSS Rally : संघाच्या मिरवणुकीत हातात काठी घेऊन गणवेश घालून सहभाग घेणारा सरकारी अधिकारी निलंबित; राज्यात वादाची ठिणगी!

Nagpur Accident : दुर्दैवी घटना! 'स्कूलबसच्या चाकाखाली आल्याने चिमुकल्याचा मृत्यू'; कुटुंबियांचा आक्राेश, पार्थ धावला अन्..

ODI ऐवजी T20 मॅच! लंकेला नमवून दक्षिण आफ्रिकेचा विजयी चौकार, भारताची धाकधूक वाढली, टॉप४ चं गणित बिघडणार?

Latest Marathi News Live Update : नांदेडच्या चेनापूर तांड्यात 70 ते 75 जणांना पाण्यातून विषबाधा

Pune Municipal Corporation: पुणे महापालिकेतील ‘टीडीआर’ मिळणार ९० दिवसांत; एक नोव्हेंबरपासून आदेशाची अंमलबजावणी हाेणार

SCROLL FOR NEXT