police arrest thief e-sakal
मुंबई

पोलिसांची तत्परता! अवघ्या १२ तासात खूनी पतीला अटक

पत्नीला रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावरच टाकून पती निघाला होता गावी

विराज भागवत

मुंबई: पत्नीच्या डोक्यात दगड टाकून हत्या (Murder) करणाऱ्या आरोपीला अटक करण्यात भायखळा पोलिसांना (Byculla Police) यश आले आहे. हत्या करून आरोपी गावी उत्तर प्रदेशात (Uttar Pradesh) पळण्याच्या तयारीत होता. पण पोलिसांच्या कार्यतत्परतेमुळे गुन्हा घडल्यानंतर अवघ्या 12 तासांच्या आत आरोपीला भायखळा पोलिसांनी अटक (Arrest) केली. (Murderer Husband arrested within 12 hours of crime)

नक्की काय घडलं...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर भायखळा पोलिसांचे पथक कर्तव्य बजावत होते. त्यावेळी मुंबई पोलीस दलाच्या मुख्य नियंत्रण कक्षातून महिलेवर हल्ला झाल्याची माहिती आली. त्यानुसार भायखळा पोलिसांनी तत्काळ हॉस्पिटल गाठले. हॉस्पिटलच्या बाहेरील फूटपाथवर एक महिला रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती. पोलिसांनी त्या महिलेला जे जे रुग्णालयात नेले. मात्र त्या महिलेचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर भायखळा पोलिसांनी कलम 302 अंतर्गत गुन्हा दाखल केला.

या गुन्ह्याचा तपास करत असताना गुन्ह्याचा घटनस्थळी कोणतेही सीसीटीव्ही फुटेज अथवा प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. अशा स्थितीत पोलिसांनी तपास सुरू केला. तपासा दरम्यान आरोपी पती उत्तर प्रदेशातील मूळगावी पळून जाण्याच्या तयारीत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार सापळा लावून पोलिसांनी आरोपीचा कसोशीने शोध घेतला आणि आरोपी संतोष रामकिशोर यादवला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता त्याने महिलेचा खून केल्याची कबुली दिली.तसेच, आरोपीचा मुंबईतील कोणताही कायमचा रहिवासी पत्ता नसल्याचे तपासात निष्पन्न झाले.

(संपादन- विराज भागवत)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT