Muslim community decided Eid-e-Milad procession will take place on second day of Anant Chaturdashi 2023  
मुंबई

Mumbai Ganpati Visarjan 2023 : अनंत चतुर्दशी अन् ईद एकाच दिवशी; मुस्लिम समुदायाने घेतला 'हा' मोठा निर्णय

रोहित कणसे

मुंबईत गणपती विसर्जनासाठी मोठ्या संख्येने भाविक रस्त्यावर येतात. या दिवशी मोठ्या उत्साहात मिरवणूका काढण्यात येतात. दरम्यान 28 सप्टेंबर रोजी एकाच दिवशी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद येत आहे. यामुळे यंदाच्या ईद-ए-मिलाद च्या मिरवणूका या अनंत चतुर्दशीच्या दुसऱ्या दिवशी निघणार आहेत. मुस्लिम समुदायाकडून याबद्दलचा निर्णय घेण्यात आला आहे.

या दोन्ही सणांच्या पार्श्वभूमिवर दोन्ही समुदायातील बंधुत्व जोपासण्याच्या उददे्शाने तसेच दोन्ही सण निर्विघ्न आणि शांततेत पार पडावेत या उद्देशाने ईदच्या मिरवणूका एक दिवस पुढे ढकलण्यात आल्या आहेत बुधवारी भायखळा येथील खिलाफत हाऊस येथे मुस्लिम प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

ज्येष्ठ मौलवी मौलाना मोईन अश्रफ कादरी (मोईन मियाँ) यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत, ईद-ए-मिलाद 28 सप्टेंबरला असली तरीही शांतता आणि सौहार्दाच्या हितासाठी जुलूस एक दिवस पुढे ढकलल्यास कोणतीही अडचण येणार नाही, असा निर्णय घेण्यात आला. बैठकीला माजी मंत्री आणि काँग्रेस नेते आरिफ नसीम खान, समाजवादी पक्षाचे आमदार रईस शेख आणि राष्ट्रवादीचे प्रवक्ते नसीम सिद्दीकी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Update : महाराष्ट्रात पुन्हा पावसाचा जोर ! 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट, जाणून घ्या आज तुमच्या भागात कसे असेल हवामान?

ढिंग टांग : ‘हम्म्मऽऽ’...चा हुंकार!

मानसवेध : तमसो मा ज्योतिर्गमय

विशेष : कृत्रिम बुद्धिमत्ता आणि भविष्यातील निर्णय

Poha-Rava-Curd Pancake: पोहे नेहमीच बनवता? एकदा करून पाहा पोहे-रवा दही पॅनकेक; चवीला कुरकुरीत, आतून मऊ!

SCROLL FOR NEXT