शिवडी : कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लाॅकडाऊनचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन सरकारतर्फे केले जात असतानाही अनेक ठिकाणी नागरिक त्याचे सर्रास उल्लंघन करत आहे. मुंबईतील मरीन लाईन्स येथील धोबीतलाव मार्केटमध्ये मटण, मच्छीसाठी ग्राहकांची झुंबड उडत आहे. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडत आहे. येथील दुकानदार ग्राहकांना सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्याचे आवाहन करत आहेत; मात्र ग्राहक कोणालाच जुमानत नसल्याने कोरोनाचा धोका वाढत आहे.
धोबीतलाव मार्केटमध्ये गर्दी होऊ नये यासाठी महापालिकेने भाजीविक्रेत्यांना मुंबादेवी मैदान येथे स्थलांतरित केले होते; परंतु काही विक्रेते धोबीतलाव येथे ठाण मांडून बसले आहेत. त्यात आता चिकन, मटण व मच्छी विक्रेते बसत असल्याने सकाळी 6 ते दुपारी 12 वाजेपर्यंत ग्राहकांची एकच गर्दी मार्केटमध्ये होत आहे. येथील स्थानिक दुकानदार निलेश जाधव व किशोर राठोड ग्राहकांना वारंवार सोशल डिस्टनसिंगचे पालन करण्यास सांगतात; मात्र ग्राहकांची गर्दी आटोक्यात येत नाही.
स्थानिकांना भीती
धोबीतलावमध्ये नवजीवनवाडी व कॅनी हॉटेल येथे कोरिनारुग्ण सापडले आहेत. त्यात मार्केटमध्ये नागरिकांची गर्दी होत असल्याने स्थानिकांनी चिंता व्यक्त केली आहे. या गर्दीमुळे एपी मार्केटमधील नागरिकांना धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे महापालिका व पोलिसांनी तातडीने येथे लक्ष घालून कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.
नागरिकांची अशीच गर्दी होत राहणे धोक्याचे आहे. त्यामुळे महापालिकेने फेरीवाल्यांवर व कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. याकरिता उपायुक्त हर्षद काळे व सी विभाग सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली आहे. लवकरच योग्य कारवाई करण्यात येईल.
- आकाश पुरोहित, स्थानिक नगरसेवक
Mutton,fish consumer does not follow social distancing at dhobi talaw
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.