bharati pawar sakal media
मुंबई

पालघर : राज्य सरकारचा ऑक्सिजन घोटाळा; केंद्रीय आरोग्य राज्य मंत्र्यांकडे तक्रार

सकाळ वृत्तसेवा

विरार: राज्यात सत्तेवर असलेले महाविकास आघाडीचे सरकार (mva government) आणि भाजप (bjp) मध्ये सद्या आरोप प्रत्यारोपाच्या (allegations) फैरी झडत असतानाच आता पालघर जिल्ह्यात (palghar) सरकारने ऑक्सिजन घोटाळा (oxygen scam) केल्याचा आरोप भाजपचे विक्रमगड शहर अध्यक्ष परेश शेडगे (paresh shedge) यांनी केला असून त्यांनी याबातची तक्रार केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार (bharati pawar) यांच्याकडे केल्याने खळबळ उडाली आहे.

केंद्रीय स्वास्थ व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ. भारती ताई पवार* यांच्या जन आशीर्वाद यात्रे मध्ये विक्रमगड तालुक्यातील हातने येथिल रिवेरा डि.सी.एच.हाँस्पिटल येथे भेट दिली असता, विक्रमगड शहर अध्यक्ष, परेश श. रोडगे* यांनी पालघर मधिल राज्य सरकारचा आँक्सिजन महाघोटाळ्या बाबतची माहिती भारती पवार यांना दिली. त्यांनी सांगितले कि, केंद्र सरकारने आँक्सिजन रिफिल संदर्भात दरा बाबत परिपञक काढले होते.

त्यानुसार पर क्युबिक मिटर *15.22 रू. प्रमाणे सर्व करांसहीत बिल अदा करणे बंधनकारक होते, असे असताना पालघर जिल्ह्यातील रिवेरा कोविड सेंटर, टिमा कोविड सेंटर व आयडिअल पोशेरी कोविड सेंटर या जिल्ह्यातील तिनही सेंटरवर 168.22 रू. व त्याहीपेक्षा जास्त प्रती क्युबीक मिटर दर देऊन एका कंपनीला बिलं अदा केल्याचे ठोस पुरावे मंत्र्याना सादर केले. प्रत्येक वेळीच्या रिफिल मागे लाखोंचा भ्रष्टाचार झाल्याचे पुरावे समोर ठेवल्याने प्रशासनाचे धाबे दणाणले आहेत.

या भ्रष्टाचारामागे कुणाचे हात आहेत याचा शोध घेण्याचे आदेश केंद्रिय मंञी आरोग्य राज्य मंत्री भारती पवार यांनी दिले असून या विषयीचे सर्व देयके थांबविण्याचे आदेश प्रशासनाला दिले.यापूर्वी वसई विरार महानगरपालिकेला येणार ऑक्सिजनचा ट्र्क उतरत हलविल्याने खळबळ उडाली होती . तर आता हा घोटाळा पुढे आला आहे. त्यामुळे राज्य सरकार अडचणीत श्यक्यता वर्तविण्यात येत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kolhapur : शेतकऱ्यानं म्हशी घ्यायला ७ लाख साठवले, सहावीत शिकणाऱ्या लेकानं गेमवर ५ लाख उडवले; बँक स्टेटमेंट बघून बसला धक्का

India Vs England : दुसऱ्या कसोटीतील लाजीरवाण्या पराभवानंतर इंग्लंडचा मोठा निर्णय, 'या' वेगवान गोलंदाजाचा केला संघात समावेश

Weekly Astrology 7 to 13 July 2025: या आठवड्यात कोणत्या राशींना होणार आर्थिक लाभ अन् नोकरी व्यवसायत मिळेल उत्तम संधी, वाचा साप्ताहिक राशिभविष्य

Latest Maharashtra News Updates : मुंबईत वाहतूक ठप्प! मोनो रेल सेवा बंद, मेट्रोमध्ये तांत्रिक बिघाडाने प्रवाशांचे हाल

Global Club Championship: पाकिस्तानला डावलण्याची शक्यता; जागतिक क्लब अजिंक्यपद स्पर्धा : पाच संघांचा सहभाग

SCROLL FOR NEXT