लॉकडाऊन असूनही नागपुरी संत्रीचा देशभर बोलबाला!  
मुंबई

लॉकडाऊन असूनही नागपुरी संत्रीचा देशभर बोलबाला!

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात रेल्वेची फक्त जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक सुरू आहे. महिनाभरात नागपूर येथून सुमारे 2040 पेट्या संत्री देशभरात पोहोचवण्यात आली. रेल्वेच्या मुंबई, नागपूर, पुणे, सोलापूर आणि भुसावळ या विभागांतून एका महिन्यात 2000 टनांहून जास्त जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक झाली आहे. 

मध्य रेल्वेने लॉकडाऊनच्या काळात औषधे, नाशवंत वस्तू, जीवनावश्‍यक वस्तूंच्या वाहतुकीसाठी 220 पार्सल गाड्या चालवण्याची योजना आखली आहे. त्यापैकी 125 गाड्या चालवण्यात आल्या असून, 95 गाड्या नियोजित आहेत. या पार्सल गाड्यांमधून मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने राऊरकेला आणि टाटानगर येथे 39 टन संत्र्यांच्या पेट्या पोहोचवल्या. 

कोलकाता, गुवाहाटी, सिकंदराबाद, चेन्नई, झारसुगुडा, टाटानगर या ठिकाणी संत्री, 216 टन औषधे आणि इतर वैद्यकीय उपकरणे पोहोचवण्यात आली. मध्य रेल्वेने पार्सल सेवेद्वारे औषधे, मास्क, वैद्यकीय साधने, फळे, भाज्या, अंडी, बियाणे, टपाल, नाशवंत वस्तू आणि कच्च्या मालाची वाहतूक सुरू ठेवली आहे. 23 मार्च ते 22 एप्रिलपर्यंत 70 हजार 374 वॅगनमधून जीवनावश्‍यक वस्तूंची वाहतूक केल्याचे मध्य रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tukaram Mundhe Election Commissioner : तुकाराम मुंढे निवडणूक आयुक्त होणार? मुंबईच्या आंदोलनात कोणी केली मागणी

Electric Vehicle Policy: सरकारी योजना! इलेक्ट्रिक वाहनांवर १५ लाख रुपयांपर्यंतची सवलत; काय आहे नवीन स्कीम?

Latest Marathi News Live Update : जेलमध्ये टाकलं तर… अभिजीत दिपके म्हणाले मी पुन्हा येईन

Dive Agar Incident : 'चेहऱ्याची त्वचा खराब होईल म्हणून पाण्यात गेलो नाही आणि वाचलो'; प्रत्यक्षदर्शी विद्यार्थ्याची व्यथा

Alandi News : विनर्स अकॅडमीवर नगरपरिषदेची कारवाई; इमारत सील

SCROLL FOR NEXT