मुंबई

नालासोपाऱ्यात चेन स्नॅचिंग करणारे चोरटे अटकेत, ३ लाखांचा मुद्देमाल जप्त

विजय गायकवाड

मुंबईः नालासोपऱ्यात चेन स्नॅचिंग करणाऱ्या दोन सराईत चोरट्याना अटक करण्यात  तुळींज पोलिसांना यश आलं आहे. या दोन्ही चोरट्यांकडून  3 लाख 34 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. हे दोन्ही चोरटे रेकॉर्डवरील गुन्हेगार असून यांच्याकडून आणखी मोठ्या गुन्ह्याचा उकल होण्याची शक्यता असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे. मीरा भाईंदर वसई विरार आयुक्तालय झोन 03 चे पोलिस उपआयुक्त प्रशांत वाघहोंडे यांनी सांगितले आहे

मनवर माहेबूब शेख (19) आणि अमजत बफाशीर खान (21) असे या दोन आरोपींची नाव असून हे दोघेही नालासोपारा पूर्वेकडील राहणारे आहेत. सकाळ संध्याकाळच्या वेळेत महिला, ज्येष्ठ नागरिक, कामावर जाणारे प्रवाशांवर पाळत ठेवून हे दोघेजण भरघाव वेगात मोटारसायकलवर येऊन, महिला आणि ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील सोन्याची साखळी, मंगळसूत्र आणि इतर दागिने हिसकावून फरार होत होते. 

मागच्या 4 महिन्यापासून तुळींज पोलिस स्टेशन हद्दीमध्ये चेन स्नॅचिंगचे प्रमाण वाढले होते. यालाच आळा घालण्यासाठी पोलिसांनी रेकॉर्डवरील आरोपींचा शोध घेऊन या दोघांना ताब्यात घेऊन तपास केला. त्यानंतर तुळींज पोलिस ठाण्यातील 6 गुन्हे केले असल्याची आरोपींनी कबुली दिली आहे. या चोरट्यांकडून 2 लाख 24 हजार रुपये किंमतीचे सोनसाखळ्या आणि मंगळसूत्र, 1 लाख 10 हजार रुपये किंमतीच्या तीन मोटारसायकल असा एकूण 3 लाख 34 हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आणखी काही गुन्हे या आरोपिकडून उघड होतात का याचा तपास तुळींज पोलिस करत आहेत.

----------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Nalasopara chain snatching case two thieve arrested With 3 lakh

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

तुझ्या सेलिब्रेशनचा अर्थ काय? Rohit Sharma याला जड्डूचा सवाल; हिटमॅनचं उत्तर ऐकून रवी शास्त्रींही हसू लागले, Video Viral

Shaktipeeth Highway : ‘शक्तिपीठ’ महामार्गाला वेग; १२९ गावांमध्ये संयुक्त मोजणी पूर्ण, सरकारची मोठी तयारी

Buddhist Religion: बौद्ध धर्माचा संवाद - साहित्य विस्तार

IND vs WI 2nd ODI : भारताचा रेकॉर्ड ब्रेकिंग विजय! शुभमन गिलची दोन वर्ल्ड रेकॉर्ड्सना गवसणी; रोहितची बॅट तळपली

Chhatrapati Sambhajinagar News: कायगावात विष प्राशन केलेल्या विवाहितेचा मृत्यू; गंगापूर पोलिसांत आकस्मिक मृत्यूची नोंद

SCROLL FOR NEXT