मुंबई

७३ वर्षांनंतर मुंबईच्या इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या शिवाजी पार्कच्या नावात बदल

सुमित बागुल

मुंबई : दादरचे प्रसिद्ध शिवाजीपार्क मैदान. शिवसेनेच्या दसरा मेळाव्यापासून ते क्रिकेटची कोचिंग आणि विविध सामान्यांपर्यंत. या मैदानाने मुंबईचा इतिहास पाहिलाय आणि अनुभवला देखील आहे. याच शिवाजीपार्क मैदानाच्या नावामध्ये आता एक बदल करण्यात आलाय. बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून तशी अधिकृत पाटी देखील मैदानाच्या गेटवर लावण्यात आली आहे. 

दादरमधील शिवाजी पार्क मैदानाचे नाव आता छत्रपती शिवाजी महाराज मैदान म्हणून बदलण्यात आलं आहे.  त्यामुळे यापुढे केवळ शिवाजी पार्क मैदान नव्हे तर छत्रपती शिवाजी महाराज मैदान म्हणून हे ऐतिहासिक मैदान ओळखलं जाणार आहे. बृहन्मुंबई महानगर पालिकेकडून मैदानाच्या गेटवर नवीन पाट्या लावण्यात आल्या आहेत. खरंतर या नामविस्तारासाठीचा प्रस्ताव मार्च महिन्यात मुंबई महापालिकेच्या मंजूर करण्यात आला होता.

छत्रपती शिवाजी महाराज मैदानाबाबत थोडक्यात  : 

छत्रपती शिवाजी महाराज मैदानाची सुरवातीची ओळख म्हणजे 'माहीम पार्क'. त्यानंतर १० मे १९२७  साली या मैदानाचे नामकरण शिवाजी पार्क असं करण्यात आलं. पुढे नामांतराच्या तब्बल ३९ वर्षानंतर लोकवर्गणीतून या मैदानात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला. त्यानंतर आता शिवाजी पार्क मैदानाचा नामविस्तार छत्रपती शिवाजी महाराज मैदान असा करण्यात आला आहे. तब्बल ७३ वर्षानंतर हा नामविस्तार केला गेलाय. 

name of shivaji park finally changed to chatrapati shivaji mahajar maidan

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कूलिंग चेंबरमध्ये स्फोटानंतर इमारत कोसळली, ९ कामगारांचा मृत्यू; माजी आमदाराच्या मालकीच्या कोल्ड स्टोरेजमध्ये दुर्घटना

Navi Mumbai: मुलगा घरी एकटाच, पालक घरी येताच समोर जे दिसलं त्यानं पायाखालची जमीनच सरकली, नवी मुंबईत काय घडलं?

IPL सारखीच नवी टी२० स्पर्धा, 'या' क्रिकेट बोर्डानं केली घोषणा; सुरुवात कधी?

IPL 2026 Video: धोनी वयाच्या ६० व्या वर्षापर्यंत खेळणार? थालाचं उत्तर ऐकून आख्ख्या स्टेडियममध्ये जल्लोष

अमेरिकेचं एक पाऊल मागे, युद्धाला ब्रेक! इराणसोबत सकारात्मक चर्चा, डोनाल्ड ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT