Kirit Somaiya alleges on Nandkishore Chaturvedi | Kirit Somaiya on Uddhav Thackeray sakal Media
मुंबई

उद्धव ठाकरेंचे मेहुण्याच्या कंपनीसोबत काय संबंध?, सोमय्यांचा सवाल

हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला फरार घोषित करण्याची सोमय्यांची मागणी

निनाद कुलकर्णी

मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हवाला किंग नंदकिशोर चतुर्वेदीला कुठे लपवले आहे याची माहिती जनतेला द्यावी, असे भाजपने नेते किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना केली आहे. यावेळी त्यांनी नंदकिशोर चतुर्वैदी यांच्या कंपन्यांची यादी समोर अल्याचे सांगत चतुर्वेदींनी फरार घोषित करावे, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. बहुतेक त्यांच्या या सगळ्या कंपन्या एकाच पत्त्यावर रजिस्टर असून, हेच चतुर्वेदी गायब आहेत, त्यामुळे त्यांना फरार घोषित करावे, असे किरीट सोमय्या यांनी म्हटले आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. (Kirit Somaiya Alleges on Uddhav Thackeray and Nandkishore Chaturvedi)

चतुर्वेदीचे ठाकरेंसोबत आर्थिक व्यवहार असून, आदित्य, तेजस ठाकरे यांच्याबरोबर चतुर्वेदीचे अनेक व्यवहार असल्याचाही आरपो यावेळी सोमय्या यांनी केले असून, नंदकिशोर चतुर्वैदींबाबत मुख्यमंत्री ठाकरे गप्प का? असा सवालदेखील सोमय्या यांनी यावेळी उपस्थित केला आहे. मुख्यमंत्री ठाकरेंच्या मेहुण्याची श्रीजी होम कंपनी असून, या कंपनीशी आपला संबंध काय हे देखील ठाकरे यांनी सांगण्याची मागणी सोमय्या यांनी केली आहे. श्रीजी होम कंपनीत 29 कोटींचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा झाल्याचेही यावेळी सोमय्या यांनी माध्यमांसमोर सांगितले. या कंपनीचा आणि उद्धव ठाकरे यांचा संबंध काय हे उद्धव ठाकरे यांनी सांगितले पाहिजे, असं सोमय्या म्हणाले.

प्रवीण कलमे कुठे? सोमय्यांचा सवाल

यावेळी पत्रकार परिषदेत बोलताना सोमय्या म्हणाले की, माझ्या विरोधात आरोप करणारे प्रवीण कलमे कुठे आहेत? असे म्हणत याची माहिती जितेंद्र आव्हाड देणार का? असा प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच आरोप करणारे कलमे भारतात आहेत की परदेशात हेही सांगावे असे म्हटले आहे. कलमे यांना जितेंद्र आव्हाड यांनी मदत केली? अनिल परब यांनी मदत केली की उद्धव ठाकरे यांनी मदत केली? असे अनेक प्रश्न यावेळी त्यांनी केले असून, कलमे यांनादेखील फरार घोषित केले जावे, अशी मागणी सोमय्या यांनी यावेळी केली आहे.

पुराव्यांनंतर उत्तर देणार

यावेळी सोमय्यांनी संजय राऊत यांनी केलेल्या शौचालय घोटाळ्याच्या आरोपांवर प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आरोप करणारे राऊत जेव्हा या सर्व प्रकरणात पुरावे देतील तेव्हाच आपण उत्तर देऊ असे सोमय्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

UPI व्यवहारांवर द्यावे लागणार शुल्क; नीती आयोगाच्या उपाध्यक्षांचे संकेत, कारणही सांगितलं...

Karmad News : उघड्या लिफ्टमधून बियाण्याची पोती नेताना तरुणाचा मृत्यू; कंपनी मॅनेजर, एचआर अधिकारी व कंत्राटदाराविरुद्ध गुन्हा

Delhi Police IPS Transfers : दिल्ली पोलिस दलात मोठा फेरबदल; 5 आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, कोणाची कुठे नियुक्ती? पाहा बदल्यांची यादी

Bogus Doctor Crime : वारजे, खराडीत बोगस डॉक्टरांवर कारवाई; मनपाच्या बोगस वैद्यकीय व्यावसायिक शोध समितीची कारवाई

Latest Marathi News Live Update : परवानगी नाकारली तरी मुंबईत जाणारच; जरांगेंचा निर्धार

SCROLL FOR NEXT