nandurbar patient
nandurbar patient sakal media
मुंबई

गर्भाशयातच आला कवटीतून मेंदू बाहेर! वाडीयात यशस्वी शस्त्रक्रिया

भाग्यश्री भुवड

मुंबई : दुर्मिळ आजाराने ग्रस्त नंदुरबारमधील (nandurbar) शेतकऱ्याच्या 4 महिन्यांच्या बाळाच्या मेंदूवर (child brain) मुंबईतील वाडिया रूग्णालयात (wadia hospital) यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. तब्बल आठ तासांच्या शस्त्रक्रियेनंतर या बाळाला नवजीवन देण्यात वाडीया रुग्णालयातील डॉक्टरांना यश आले आहे. चार महिन्याच्या कार्तिकला (kartik) जन्मजात एन्सेफॅलोसेल डिसऑर्डर सारखा दुर्मिळ आजार होता. मातेच्या गर्भाशयातच बाळाचा मेंदू कवटीमधून नाकापर्यंत खाली येऊन डोळे आणि नाकाला झाकून वाढत होता. त्यावर त्वरीत शस्त्रक्रिया (surgery) आवश्यक होती. (nandurbar-child brain-wadia hospital-kartik-surgery-nss91)

महाराष्ट्रातील नंदुरबारमधील धनाजी पुत्रो गावातील शेतकरी सुरेश कुटा पावरा आणि भारतीबाई सुरेश पावरा यांच्या बाळाला जन्मजात एन्सेफॅलोसेल डिसऑर्डरचे निदान झाले होते. बाळाच्या चेहऱ्यावर प्रचंड सूज, कपाळावर आलेली ही सूज (मेंदूचा काही भाग) जवळजवळ नाकापर्यंत आली होती. यामुळे बाळाला गिळणे, श्वास घेणे कठीण झाले आणि त्याची दृष्टी देखील कमकुवत झाली. तेथील डॉक्टर आणि परिचारिका यांनी कुटुंबाला दुसऱ्या रूग्णालयात उपचारासाठी त्वरीत नेण्यास सांगितले.

त्यानंतर, त्यांची तेथील रुग्णालयात महिनाभर उपचार सुरू होते. परंतू, प्रकृतीत काही सुधार नव्हता. गावातल्या प्राथमिक आरोग्य सेवा प्रदात्याने वाडिया रूग्णालयात नेण्याचा सल्ला दिला. त्यांनतर सहा दिवसांनी कुटुंबियांनी बाळाला मुंबईला नेण्याचे धाडसी पाऊल उचलले. कोरोना काळात असलेली संसर्गाची भिती आणि या काळात बाळाला घेऊन मुंबई गाठणे ही या कुटूंबियांसाठी आव्हानात्मक बाब होती. पण, मुंबई गाठली. बाळाचे प्राण वाचवण्यासाठी न्यूरोसर्जरी बरोबरच क्रॅनिओफेशियल प्लास्टिक सर्जरी टीम देखील तितकीच प्रयत्नशील होती.

काय होती नेमकी परिस्थिती ?

वरिष्ठ न्युरोसर्जन डॉ. चंद्रशेखर देवपुजारी यांनी बाळाची नेमकी परिस्थिती सांगताना सांगितले, बाळाला फ्रंटोनॅसल एन्सेफॅलोसेलेचे निदान झाले आणि ते क्रॅनिओफेशियल विकृतीशी संबंधित होते. या दुर्मिळ अवस्थेमुळे बाळाचा मेंदू कवटीच्या मधून त्याच्या नाकापर्यंत खाली गेला. एन्सेफॅलोसेलेचे प्रमाण वीस हजारांमध्ये एक बाळ असे जन्माला येऊ शकते. पाश्चात्य जगाच्या तुलनेत भारतात हे प्रमाण जास्त असून फॉलीक एसिडची कमतरता, अकाली प्रसुती आणि गर्भधारणेदरम्यानची गुंतागुत या गोष्टी कारणीभूत ठरतात. मुलाचा मेंदू एखाद्या पिशवीसारखा खाली उतरला होता आणि त्याच्या मेंदू आणि डोळ्यातील हाड अपुरे पडले होते. त्याच्या मेंदूसह, त्याच्या मेंदूतील द्रवपदार्थाची जागा (वेंट्रिकल) आणि त्याच्या मेंदूची धमनी (आधीची सेरेब्रल धमनी) एन्सेफॅलोसेलेमध्ये होती.

जरी त्याच्या मेंदूच्या कार्यशैलीवर कोणताही परिणाम झाला नाही. पंरतू, बाळाला नाकातून श्वास घेणे अवघड जात असल्याने तो तोंडावाटे  श्वास घेत होता. त्याची दृष्टी देखील कमजोर होती आणि त्याचे नाक आणि चेहरा पूर्णपणे विकृत झाला होता. केवळ 4 महिन्यांच्या वयात,  मेंदूतील द्रवपदार्थ जागा (वेंट्रिकल) आणि रक्तवाहिनी (आधीची सेरेब्रल धमनी) थैलीमध्ये असणे हे एक आव्हान होते. अशा प्रकारे, कोविड प्रोटोकॉलचे पालन करून, बाळावर त्वरित आणि नियोजित पद्धतीने उपचार करण्यात आले.

22 जुलै 2021 ला क्रॅनिओटॉमी (विशिष्ट प्रकारची प्लास्टिक शस्त्रक्रिया) प्रक्रिया नियोजित करण्यात आली आणि त्याची कवटी उघडून मेंदू मागे घेण्यात आला. काम न करणा-या मेंदूच्या पिशवीतील सामान्य मेंदू त्याच्या चेहऱ्यावर लटकलेला होता. नंतर, मेंदू पुन्हा या पोकळीत पडू नये याची खात्री करत दोन डोळे आणि त्यावरील दुसरे हाड यांच्यामध्ये एक कृत्रिम हाड बसवण्यात आले.

8 तास शस्त्रक्रिया

8 तास चाललेली शस्त्रक्रिया समाधानकारक होती,  त्यानंतर बाळाला 2 दिवस अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले आणि नंतर सामान्य वॉर्डमध्ये हलवण्यात आले. जर बाळाच्या उपचारात अजून विलंब झाल्या असता तर सूज आलेल्या भागातून मेंदूचा द्रव बाहेर पडला असता आणि मेंदूला संसर्ग झाला असता. पंरतू, वेळीच मुबंईला आणल्याने उपचार करणे शक्य झाले. लहान मुलांमध्ये, अतिरिक्त हाडे कवटीचे विरूपण होऊ शकतात. हाडांचा जबडा लावण्यासाठी हे बाळ 4 वर्षाचे झाल्यानंतर मेंदूच्या भागात आणखी एक शस्त्रक्रिया करावी लागणार आहे.

वाडिया रूग्णालयातील डॉक्टरांच्या आश्वासनानंतर आम्ही प्रथमच मुंबईत आलो. शस्त्रक्रिया गुंतागुंतीची होती. परंतु, आम्ही डॉक्टरांवर विश्वास ठेवला आणि आमच्या मुलाला त्यांच्या स्वाधीन केले. आज माझ्या बाळाला पुनर्जन्म मिळाला आहे याबद्दल मी  वाडिया रूग्णालयाचा कायम ऋणी असेल असे बाळाचे वडील सुरेश पावरा म्हणाले. न्यूरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी टीम, भूलविकारतज्ञ, नर्सिंग आणि आयपीसीयू टीम या सा-यांमुळे ही शस्त्रक्रिया प्रचंड यशस्वी झाली. या शस्त्रक्रियेमुळे आता बाळसामान्य आयुष्य जगू शकते असे वाडिया रूग्णालयाच्या मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ मिनी बोधनवाला यांनी स्पष्ट केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: चाकण-शिक्रापूर मार्गावर गॅस टँकरचा भीषण स्फोट! परिसर हादरला; घरांची मोठी पडझड, पाहा व्हिडीओ

Soan Papdi: बाबा रामदेव यांना आणखी एक धक्का! पतंजलीची सोनपापडी निकृष्ट, तिघांना तुरुंगवास

Rohit Sharma : 'रोहित शर्मा फॉर्मात येणे भारतीय संघासाठी...' भारताच्या दिग्गज खेळाडूचे मोठं वक्तव्य

Pune Station: पुण्यासह पाच रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला बेड्या

Virat Kohli : इम्पॅक्ट खेळाडूच्या नियमावर विराटचीही टीका;सामन्याचा समतोल बिघडत असल्याचे व्यक्त केले मत

SCROLL FOR NEXT