Narayan-Rane-Uddhav-Sanjay-Raut 
मुंबई

'छोट्या खात्याचा मंत्री' म्हणणाऱ्या राऊतांना राणेंचं उत्तर

Narayan Rane gives befitting reply to Shivsena Sanjay Raut CM Uddhav Thackeray मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लगावला टोला 'छोट्या खात्याचा मंत्री' म्हणणाऱ्या राऊतांना राणेंचं उत्तर

विराज भागवत

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही लगावला टोला

मुंबई: पंतप्रधान मोदी (PM Modi) यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळ विस्तारात (Cabinet Expansion) एकेकाळचे कट्टर शिवसैनिक आणि आताचे शिवसेनेचे कट्टर विरोधक असलेल्या नारायण राणे (Narayan Rane) यांना मंत्रिपद मिळालं. त्यांच्यावर सुक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयाचा कारभार सोपवण्यात आला. राणे यांची राजकीय कारकिर्द पाहता त्यांना प्रतिष्ठेपेक्षा कमी महत्त्वाचं म्हणजे 'सूक्ष्म (छोटं)' खातं देण्यात आलंय, अशी खोचक प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलं. यावर नारायण राणे यांनी त्यांना चांगलंच प्रत्युत्तर दिलं. (Narayan Rane gives befitting reply to Shivsena Sanjay Raut CM Uddhav Thackeray)

संजय राऊतांना राणेंचे रोखठोक उत्तर

"नारायण राणे हे महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री होते. त्यांनी विविध कालखंडात अनेक मंत्रिपदे भुषवली आहेत. नारायण राणे यांची राजकीय उंची पाहता त्यांना तितकं महत्त्वाचं खातं मिळालेलं नाही. त्यांना (नावाप्रमाणेच) सूक्ष्म खातं देण्यात आलं आहे. पण तरीही त्यांनी देशाचा आणि राज्याच्या विकासासाठी काम करावे ही अपेक्षा", असे मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं होतं. त्यावर राणे म्हणाले, "केंद्रीय मंत्रिपद ही मोठी जबाबदारी आहे. हे खातं महत्त्वाचं आहे. कोणतंही खातं हे छोटं किंवा मोठं नसतं... मी जेव्हा खात्याचा कार्यभार पाहीन आणि मी जेंव्हा या खात्याला न्याय देईन, तेव्हा संजय राऊतांना कळेल की हे खातं किती महत्त्वाचं आहे!!"

मुख्यमंत्री ठाकरेंना पहिला टोला

"शरद पवार यांनी मला फोन केला. पवार मला म्हणाले की चांगले काम करा पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मात्र मला अद्याप शुभेच्छा दिलेल्या नाहीत. कारण त्यांचे मन एवढं मोठं नाही. मला मंत्रीपद मिळाल्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी अभिनंदन केलेले नाही पण महाराष्ट्रातील सर्व विभागातून मला शुभेच्छा मिळाल्या. त्याच मी त्यांच्या वतीने शुभेच्छा समजतो", अशा शब्दात त्यांनी उद्धव ठाकरेंना पहिला टोला लगावला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Hasan Mushrif Shivaji Patil : आमदार शिवाजी पाटील गोकुळच्या पहिल्याच कुस्तीत चितपट, मंत्री हसन मुश्रीफांचा पहिला डाव यशस्वी

Mumbai: मुली बेपत्ता होण्याच्या प्रकरणांत महाराष्ट्र पहिला, बालकांविरुद्धच्या गुन्ह्यांमध्येही वाढ; क्रायची नोंद

Suryakumar Yadav: 'काही गोष्ट स्पष्ट करायच्यात, माझ्या दुखापतीबद्दल बोलणारे...' सूर्याने सांगितलं सत्य नेमकं काय? फॉर्मवरही भाष्य

Pune Police Restrictions: पुण्यात आज रात्रीपासून १४ दिवसांसाठी जमावबंदी का? नेमकं कारण काय?

Kolhapur Student End Life : वडील, भावाने गाडीवरून कॉलेजला सोडलं नाही; चिडून थेट गळफासचं घेतला, कोल्हापुरातील घटनेनं खळबळ

SCROLL FOR NEXT