Uddhav-Thackeray-Narayan-Rane 
मुंबई

घरातले सगळे कोरोना पॉझिटिव्ह अन्...; राणेंचा मुख्यमंत्र्यांना टोला

विराज भागवत

सध्या कोरोनाचा कहर राज्यात वाढताना दिसत आहे. याच पार्श्वभूमीवर राज्यात रात्री ८ ते सकाळी ७ या कालावधीत नाईट कर्फ्यू लावण्यात आला आहे. तसेच शुक्रवार रात्र ते सोमवारी सकाळ या कालावधीत वीकेंड लॉकडाउनची घोषणादेखील करण्यात आली आहे. कोरोनाला रोखण्याच्या दृष्टीने राज्य सरकारकडून हे नवे नियम सोमवार रात्री आठपासून लागू करण्यात आले आहेत. याच मुद्द्यावरून भाजप नेते नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना सणसणीत टोला लगावला.

राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी सोमवारी गृहमंत्रीपदाचा राजीनामा दिला. परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हावी असे आदेश दिल्यानंतर त्यांनी पदत्याग केला. या मुद्द्यावर नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. उद्धव ठाकरे हे राज्याचे प्रमुख असल्याने त्यांनी या साऱ्या प्रकरणाची जबाबदारी घ्यायली हवी का? प्रश्न पत्रकारांकडून विचारण्यात आला होता. या प्रश्नावर नारायण राणेंनी मुख्यमंत्र्यांना सणसणीत टोला लगावला. " मुख्यमंत्र्यांच्या घरातील सगळे कोरोना पॉझिटिव्ह... त्यांनी कुटुंबाची तरी काय जबाबदारी पाळली?", असा टोला त्यांनी लगावला.

"राज्यात एवढे मोठे गुन्हे घडले आहेत. त्याची मुख्यंमंत्र्याकडे माहिती नाही असं ते कसं म्हणू शकतात. मुख्यमंत्र्यांना दररोर सकाळी राज्यातील परिस्थितीचे ब्रिफिंग केले जाते. त्यामुळे मला त्यांच्या म्हणण्यात तथ्य वाटत नाही", असं राणे म्हणाले.

शरद पवार यांच्याबद्दल...

"सध्या राज्यात घडत असलेल्या गोष्टी हे शरद पवारांचे अपयश नाही. प्रत्येक पक्षाचा प्रमुख आपल्या मंत्र्यांना किंवा नेत्यांना शक्य तितकं वाचवण्याचा प्रयत्न करतो. कारण एक नेता घडवायला खूप वेळ लागतो", असं राणे म्हणाले.

दिलीप वळसे पाटील होणार नवे गृहमंत्री

अनिल देशमुख यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सुपूर्द केला. त्यानंतर राज्याचे नवे गृहमंत्री कोण असा सवाल उपस्थित झाला होता. त्या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळालं. अनिल देशमुख यांचा राजीनामा स्वीकारावा आणि त्याजागी गृह विभागाचा कार्यभार राष्ट्रवादीचे दिलीप वळसे पाटील यांच्याकडे देण्यात यावा, असं पत्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपालांना पाठवलं. दिलीप वळसे पाटील यांच्याकडे सध्या कामगार विभागाचा कार्यभार आहे. तो अतिरिक्त कार्यभार आता हसन मुश्रीफ यांच्याकडे सोपवण्यात यावा तसेच राज्य उत्पादन शुल्क विभागाचा अतिरिक्त कार्यभार हा उपमुख्यमंत्री आणि वित्तमंत्री असलेले अजित पवार यांच्याकडे देण्यात यावा अशी विनंतीदेखील पत्रात करण्यात आली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ITR Filing 2026: आयकर रिटर्न भरण्याच्या तारखांमध्ये मोठा बदल! पगारदार आणि व्यावसायिकांसाठी वेगळी डेडलाइन; तुमची तारीख तपासा

IND vs ENG : भारतीय संघाचा स्टार खेळाडूच्या फिटनेसची चिंता कायम; शुभमन गिल, लोकेश राहुल यांनी घेतला निर्णय

Latest Marathi News Live Update : बुलढाणा पोलीस अधीक्षकांचं निलंबन करण्याच्या मागणीसाठी आ.संजय गायकवाड पुत्रांचा एल्गार

Pune Water Issue : टँकर माफियांवर सभागृहात संताप! खासगी टँकरवर नियंत्रण आणा; दर निश्चित करण्याची नगरसेवकांची मागणी

Pune News: सिंहगड रोड परिसरात पाण्याच्या पाइपमध्ये अडकला रानगवा; बचावासाठी सर्व यंत्रणा घटनास्थळी, Video Viral

SCROLL FOR NEXT