मुंबई

ड्रग्स प्रकरणी मुंबईत NCB चे एकाच वेळी विविध ठिकाणी छापे, गळाला लागलेत बडे मासे ?

सुमित बागुल

मुंबई : सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी एक महिन्यापासून CBI मार्फत चौकशी सुरु आहे. यामध्ये ED मार्फत मनी लॉन्डरिंग म्हणजेच आर्थिक गैरव्यवहार आणि ड्रग्स कनेक्शनची नार्कोटिक कंट्रोल ब्युरो NCB कडून चौकशी सुरु आहे. या प्रकरणातील ड्रग्स कनेक्शनमध्ये रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि त्यांच्या अन्य काही साथीदारांना ताब्यात देखील घेण्यात आलंय.

दरम्यान, या प्रकरणी खोलात जाऊन चौकशी आणि छापेमारी सुरु आहे. रिया, शोविक आणि अन्य साथीदारांची चौकशी करून अनेक ठिकाणी धाडी टाकल्या जातायत. याच पार्श्वभूमीवर आज मुंबईत विविध ठिकाणी NCB म्हणजेच नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोनं छापेमारी केलीये. NCB च्या अधिकाऱ्यांनी आज एकाच वेळी अनेक ठिकाणी छापेमारी करण्यात आलीये. 

(NCB) नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोतील काही सूत्रांच्या माहितीनुसार रिया आणि शोविकने दिलेल्या माहितीच्या आधारे NCB कारवाई करत आहे. यावरून  बॉलिवूडमधील ड्रग्स कनेक्शन समोर येतंय. रिया आणि सुशांत यांनी ड्रग्स मागविण्यासाठी आपल्या घरामधील काम काम करणाऱ्यांसोबत एक WhatsApp ग्रुप देखील बनवला असल्याचं समोर आलेलं. त्यामुळे तो WhatsApp ग्रुप आणि इतर मोबाईल चॅटमधून यामध्ये अमली पदार्थांच्या नेटवर्कमध्ये अनेक बडे मासे असल्याची माहिती NCB च्या पथकाला मिळाली आहे.

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) यामध्ये आता सखोल चौकशी करतेय. 

narcotic control bureau conducts raids on various places in mumbai

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Loan Waiver : जुलैच्या दुसऱ्या आठवड्यापासून खात्यात जमा होणार पैसे; 56 लाख शेतकऱ्यांना 2 लाखांपर्यंत कर्जमाफी, बँक खात्यांची पडताळणी सुरू

Pune Metro: आता रस्ता ओलांडणे झाले सुरक्षित! वाकड मेट्रो स्थानकावर ६० मीटरचा पादचारी पूल; नागरिकांसाठी मोफत सुविधा

Ladki Bahin Yojana Update : लाडक्या बहिणींनो लक्ष द्या! तुमच्या बँक खात्यात 1500 ऐवजी जमा होणार 3,000 रुपये? पण 'या' 80 लाख महिलांना बसू शकतो फटका!

Wedding Destination: शोधताय? हिमालयाच्या कुशीतलं हे मंदिर बनतंय नवविवाहितांचं आवडतं ठिकाण, जाणून घ्या धार्मिक महत्त्व

Vaibhav Sooryavanshi : वैभवसाठी संजू सॅमसनला बळीचा बकरा का बनवताय? माजी खेळाडूचा संतापजनक सवाल...

SCROLL FOR NEXT