मुंबई

"बाळासाहेबांचे पोस्टर्स लाऊन मोदींनी निवडणुका जिंकल्यात", शाहांना राऊतांचं खणखणीत उत्तर

सकाळ वृत्तसेवा

महाराष्ट्रात महाविकास आघाडीकडून उद्या उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. अशातच महाराष्ट्र घडलेल्या महानाट्यावर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांनी ट्विटरच्या माध्यमातून शिवसेनेवर घणाघाती टीका केली. या टीकेला शिवसेनेचे संजय राऊत यांनी खणखणीत उत्तर दिलंय.   

शिवसेना उमेदवारांनी लावले मोदींचे पोस्टर्स 

महाराष्ट्रात शिवसेनेने कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत  हातमिळवणी करत जनतेचा अपमान केला असल्याचा आरोप अमित शाह यानी केलाय. ट्विटरवर आपलं मत मांडताना, "शिवसेनेचे सर्व उमेदवार हे आमच्या सोबत निवडणुकीच्या रिंगणात उतरलेत, त्यांचा एकही असा  उमेदवार नव्हता ज्यांनी नरेंद्र मोदींचे पोस्टर्स लावले नाहीत. आमच्या उमेदवारांपेक्षा शिवसेनेच्या उमेदवारांनी त्यांच्या मतदार संघात नरेंद्र मोदींचे मोठ-मोठे पोस्टर्स लावलेत", असं अमित शाह यानी ट्विट केलंय.  

नरेंद्र मोदींनी लावले होते बाळासाहेबांचे पोस्टर्स  

दरम्यान अमित शाहांच्या टीकेला शिवसेना नेते संजय राऊत यांनी उत्तर  दिलंय. जेव्हा बाळासाहेब होते, त्यावेळी तुम्ही त्यांचे पोस्टर लावून मतं मागितलं त्याचं काय? असा सवाल संजय राऊत यांनी विचारलाय. बाळासाहेबांचे पोस्टर्स लाऊन मोदींनी निवडणुका जिंकल्यात असं शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटलंय. 

शिवसेनेनं मोदींच्या फोटोखाली मतं मागितली आणि मोदींवर विश्वास ठेऊन जनतेनं शिवसेना आमदारांना निवडून दिलं असा आरोप भाजप अध्यक्ष अमित शाहा यांनी केला होता. त्याचा संजय राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला.
भाजपलाही शिवसेनेच्या राज्यात  फायदा झाला.

अनेक ठिकाणी केवळ शिवसैनिकांमुळं भाजप उमेदवार निवडून आले असा दावाही संजय राऊत यांनी केला.

Webtitle : narendra modi won elections using balasaheb thackerays name sanjay rauts reply to amit shah

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Municipal Election Maharashtra : AB फॉर्मवरून रुसवे-फुगवे, मारामारी…; चांद्यापासून बांद्यापर्यंत नगरसेवक होण्यासाठी राडा नाट्य, ९ जिल्ह्यात राजकीय रणकंदन

Latest Marathi News Live Update : वर्सोवा प्रभाग क्रमांक ५९ मध्ये ठाकरे गटात बंडखोरी उघड

Sangli Election : महापालिका निवडणुकीत भाजपचा मोठा निर्णय; लोकप्रतिनिधींच्या कुटुंबीयांना उमेदवारी नाही

Insurance Fraud Case : धक्कादायक प्रकार! 3 कोटींच्या विम्यासाठी मुलांनीच रचला वडिलांच्या हत्येचा कट; रात्री झोपेत असताना साप अंगावर सोडून...

तुरुंगात असलेल्या आदेंकरांच्या घरातील दोघींना राष्ट्रवादीची उमेदवारी, अजितदादांनी दिले एबी फॉर्म

SCROLL FOR NEXT