मुंबई

मलिकांच्या राजीनाम्यासाठी राष्ट्रवादीचे नरहरी झिरवळ यांची 'स्वाक्षरी'

ओमकार वाबळे

अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी राज्यपालांचं अभिभाषण अपूर्ण झाल्याने राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यात आल्या. विरोधकांनी यंदा पहिल्या दिवसापासूनच अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्षाने लावून धरली. (BJP demands resignation of Nawab Malik)

यासाठी मलिकांच्या राजीमान्याचे बॅनर तयार करण्यात आले. विधीमंडळाच्या पायऱ्यांवर भाजपाने आंदोलन केलं. आजही विरोधकांनी मलिकांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली. यासाठी भाजपच्या वतीने विधीमंडळ परिसरात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. (BJP protest in Maharashtra Assembly Session 2022)

भाजपने मलिकांच्या राजीनाम्याचं आंदोलन अधिक तीव्र केलं आहे. मलिकांचे हसीना पारकर आणि कुख्यात गुंड दाऊद इब्रहिमशी संबंधित व्यक्तींसोबत आर्थिक व्यवहार आहेत, असा आरोप भाजपच्या नेत्यांनी केलाय. सध्या मलिक ईडीच्या कोठडीत आहेत. त्यांना सात मार्चपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र, मलिकांच्या राजीनाम्यावर विरोधीपक्ष ठाम आहेत.

आज विधीमंडळ परिसरात राबवलेल्या स्वाक्षरी मोहिमेसाठी भाजपने विधानसभेचे उपसभापती नरहरी झिरवळ यांनाही स्वाक्षरी करायला लावली. झिरवळ विधीमंडळाच्या इमारतीत प्रवेश करत असताना त्या ठिकाणी भाजपचे नेते पायऱ्यांवर घोषणाबाजी करत होते. नरहरी झिरवळ येताच गोधळा दरम्यान झिरवळ यांच्याकडून भाजपच्या नेत्यांनी स्वाक्षरी करून घेतली. सध्या या स्वाक्षरीची राजकारणात चर्चा रंगलीय.

पायऱ्यांवर माणूस गोंधळून जातो - जितेंद्र आव्हाड

पायऱ्यांवर इतका गोंधळ असतो की माणूस गोंधुळन जातो. नरहरी झिरवळ ही साधी व्यक्ती आहे. आदिवासी समजातून आलेला आहे. कारण नसताना त्यांना घेरण्याचं काम करू नये, असं आव्हाडांनी म्हटलंय.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'प्रज्वल रेवण्णांचे व्हिडिओ आताचे नाहीत'; पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं थेट भाष्य

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात.. शरद पवारांनी बजावला मतदानाचा हक्क

Election Ink: इतिहास निवडणूक शाईचा; जाणून घ्या कुठे अन् कशी तयार होते मतदारांच्या बोटाला लागणारी शाई

IND vs BAN Women's T20 : चौथ्या ट्वेन्टी-२० सामन्यातही भारताचा बांगलादेशवर विजय

Mumbai News : नरेश गोयल यांना उच्च न्यायालयाचा दिलासा! २ महिन्यांचा मिळाला अंतरिम जामीन

SCROLL FOR NEXT