मुंबई

चुलीवर जेवण बनवत सिलेंडर दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचं आंदोलन

शरद भसाळे

मुंबई: गेल्या महिना भरापासून इंधन आणि गॅस सिलेंडरच्या दरवाढ मोठ्या प्रमाणात होत आहे. त्यामुळे सर्व सामान्य जनता महागाईच्या आगीत होरपळत आहे. केंद्र सरकारकडे तक्रार करून सुद्धा दुर्लक्ष केले जात असल्याने सरकारचे लक्ष वेधण्यासाठी काल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीच्यावतीने भिवंडीत विरोधात आंदोलन करण्यात आले. 

महिला शहरध्यक्ष स्वाती कांबळे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जावेद फारूकी, समीर पटेल, आसिफ खान यांच्या सह कार्यकर्त्यांनी चुलीवर भाकरी आणि पोहे बनवून आंदोलन केलं आहे. देशात दिवसेंदिवस महागाईचा भडका वाढू लागला आहे. केंद्र सरकारचे यावर कोणतेच नियंत्रण नाही. सिलेंडरच्या दरात देखील वाढ होत असल्याने महिलांचं घरातील किचनमधील बजेट कोलमडलं आहे.

महिलांवर येत्या दिवसात चुलीवर जेवण बनवण्याशिवाय पर्याय नाही. त्यामुळे भाजपचे अच्छे दिन नको म्हणत जुने दिवस पुन्हा आणा अशा घोषणा या दरम्यान देण्यात आल्या. यावेळी भाजप सरकार विरोधात प्रचंड रोष व्यक्त करण्यात आला आहे. 

आंदोलना दरम्यान बनवण्यात आलेल्या जेवणाचा आस्वाद देखील कार्यकर्त्यांनी घेतला आहे. भाजपच्या या धोरणामुळे नागरिकांचे वाईट दिवस आले असून येत्या काही दिवसात भीक मागण्याची वेळ येणार अशा आरोप आंदोलनात करण्यात आला आहे.

--------------------------------

(संपादन- पूजा विचारे)

Nationalist Congress Party Bhiwandi protest against cylinder price hike

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bengal CM News: बंगालच्या मुख्यमंत्रीपदासाठी महिला चेहरा फिक्स? भाजपमध्ये ‘या’ नावांची सर्वाधिक चर्चा; शपथविधी सोहळा ९ मे रोजी

Sangli Minor Girl Assault Case : पुणे, नाशिकनंतर आता सांगली जिल्हा हादरला!, अल्पवयीन मुलीचे अपहरण करून लैंगिक अत्याचार, मुलीस लॉजवर नेलं अन्...

बॅटिंग vs बॅटिंग कमिन्सची चाणक्यनीती की श्रेयसचा पलटवार? 'नंबर १' च्या खुर्चीसाठी आज महासंग्राम, पहा कशी असेल Playing 11

Nashik Bribe Case : नाशिकमध्ये 50 हजारांची लाच घेताना महिला मंडल अधिकारी ACB च्या जाळ्यात; न्यायालयीन आदेशाच्या अंमलबजावणीसाठी मागितली लाच

Thalapathy Vijay: “आईसारखं प्रेम दिलं…”; विजयचा प्रत्येकाने एकदा वाचावा असा भावनिक संदेश! निवडणूक जिंकल्यानंतर पहिल्यांदाच बोलले?

SCROLL FOR NEXT