Gautam Adani  sakal media
मुंबई

राष्ट्राच्या स्वाभिमानाला इजा पोहोचेल अशी टीका नको - गौतम अदाणी

कृष्ण जोशी

मुंबई : कोणी चुकले तर टीका जरूर करा, पण राष्ट्राच्या स्वाभिमानाला (Nations respect) इजा पोहोचेल किंवा राष्ट्र म्हणून आपण आत्मविश्वास (Self confidence) गमावून बसू अशी ती टीका नसावी, असे मतप्रदर्शन अदाणी समूहाचे (Adani Group) अध्यक्ष गौतम अदाणी (Gautam adani) यांनी नुकतेच केले.

प्रियदर्शनी अकादमीचा रामकृष्ण बजाज स्मृती जागतिक पुरस्कार त्यांना देण्यात आला, त्यानिमित्ताने ते बोलत होते. कोरोनाविरुद्धच्या लढ्यात भारताने एकट्याच्या बळावर बजावलेल्या कामगिरीची प्रशंसा करताना अदाणी यांनी वरीलप्रमाणे मत व्यक्त केले. समाज विभाजित करेल, अशी टीकाही कोणी करू नये, अन्यथा भारताला दुर्बळ करणे हा ज्यांचा हेतू आहे, अशांच्या हातातील आपण खेळणे बनू, असेही ते म्हणाले.

समर्थ व उत्तुंग भारत घडविणे हेच साऱ्या बजाज स्मृती पुरस्कारविजेत्यांचे ध्येय होते. कोरोनाचा हैदोस जगात होत असताना आपण त्याविरुद्ध दिलेला लढा पाहता पुढील काळात आत्मनिर्भर होण्यावाचून पर्याय नाही. त्यासाठी सर्वच पातळ्यांवर आपली ताकद वाढवली पाहिजे. येत्या वीस वर्षांत जगात सर्वात तरुण आणि मोठा मध्यमवर्ग भारतात असेल. ती बाजारपेठ प्रत्येक जागतिक कंपनीला खुणावत असेल. कृषी, वैद्यकीय, स्वच्छ उर्जा, आयटी, शिक्षण, पायाभूत सोयी या सर्व क्षेत्रात आपल्याला मोठी संधी असून आत्मनिर्भर भारताचा हाच पाया असेल. या प्रवासात भारतातील कंपन्यांनी-उद्योगांनीच पुढाकार घ्यावा, अशी अपेक्षाही अदाणी यांनी व्यक्त केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gold Rate Today: महिन्याच्या शेवटी सोन्याच्या दरात मोठी घसरण! आठवडाभरात 7 हजारांनी स्वस्त; चांदीही 14 हजारांनी घसरली; ताजा भाव किती?

Sports News : बंधने झुगारत अफगाणच्या फरिबा हाशिमीला रौप्य; तालिबानच्या राजवटीनंतर देश सोडला तरीही जिद्द कायम

Maharashtra Drought: शहरांसह गावांमध्ये पाणीकपातीचा प्रस्ताव

साताऱ्यात बापानेच लेकीला संपवलं चुलत भावाच्या मदतीने नाकातोंडात चटणीची पूड टाकली अन्....

Asian Games Athletics: रिले संघाची सुवर्ण भरारी;ॲथलेटिक्समध्ये यंदा २४ पदकांची कमाई

SCROLL FOR NEXT