नाविद यांनी बॅ. अंतुले यांच्या नावाचा कोणताही वापर न करता स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी दूरचित्रवाहिनी मालिका निर्मितीत काम केले.
नाविद यांनी बॅ. अंतुले यांच्या नावाचा कोणताही वापर न करता स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी दूरचित्रवाहिनी मालिका निर्मितीत काम केले. 
मुंबई

नाविद अंतुले यांच्यावर मुंबईत अंत्यसंस्कार 

सकाळ वृत्तसेवा

अलिबाग ः माजी मुख्यमंत्री बॅ. ए. आर अंतुले यांचे पुत्र आणि शिवसेनेचे रायगड जिल्ह्यातील नेते नाविद अंतुले (52) यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या धक्‍क्‍याने निधन झाले. त्यांच्यावर बुधवारी सकाळी मोजक्‍या नातेवाईकांच्या उपस्थितीत मुंबईत अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या आकस्मिक निधनाने चाहत्यांना मोठा धक्का बसला. 

नाविद यांनी बॅ. अंतुले यांच्या नावाचा कोणताही वापर न करता स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यांनी दूरचित्रवाहिनी मालिका निर्मितीत काम केले. त्यांनी तनहा, कोहरा, माल है तो ताल है, सराफ यांसारख्या दर्जेदार मालिकांची निर्मितीसह दिग्दर्शन केले होते. बॅ. अंतुले यांच्या निधनानंतरही ते राजकारणापासून दूर होते. 
वकिलीची पदवी घेतल्यानंतर त्यांचे सर्व शिक्षण लंडनमध्ये झाले. एक उच्चशिक्षित, सर्वसामान्यांमध्ये मिसळणारे व्यक्तिमत्त्व म्हणून ते परिचित होते. ते 
अविवाहित होते. 

हे वाचा : राज्यात पुढील तीन दिवस पाऊस

2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर त्यांचे नाव अचानक रायगडच्या राजकारणात चर्चेत आले. अनेक वर्षे राजकारणापासून दूर 
राहिल्यानंतर राजकारणातील प्रवेशाने सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. 

लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्या 
विरोधात प्रचारफेरीत भाग घेत शिवसेनेला पाठिंबा दिला होता. त्यांच्या मागे आई नर्गिस अंतुले, बहीण नीलम अंतुले (मुस्ताक अंतुले यांची पत्नी) असा परिवार आहे. 
मोजक्‍याच नातेवाईकांच्या उपस्थितीत मुंबईत नाविद यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Google Chrome Errors: गुगल क्रोम युजर्सना सरकारचा इशारा, नुकसान टाळण्यासाठी लगेचच करा 'हे' बदल

Sharad Pawar: "मेहनत घेण्याची क्षमता आणि चिकाटी..."; शरद पवारांसाठी हेमंत ढोमेचं ट्वीट

California Bridge : कुठेच न पोहोचणारा 11 बिलियन डॉलरचा पूल! कॅलिफोर्नियतला ब्रिज झाला चेष्टेचा विषय

Latest Marathi News Update : पंतप्रधान मोदी प्रचारसभेसाठी ओडिशामध्ये

Warren Buffett: गुंतवणुकीसाठी अमेरिका ही पहिली पसंती; भारताबाबत काय म्हणाले वॉरन बफे?

SCROLL FOR NEXT