suicide 
मुंबई

Navi Mumbai: १४ वर्षीय मुलीची इंस्टाग्रामवर बदनामी; उचलले टोकाचे पाऊल; गुन्हा दाखल

सकाळ डिजिटल टीम

Navi Mumbai: इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका १४ वर्षीय मुलीची इंस्टाग्रामवर बदनामी करून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात पनवेल शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे.


करंजाडे येथे राहणारी १४ वर्षीय तरुणी कामोठे येथे नववीच्या वर्गात शिक्षण घेते. एक नोव्हेंबर रोजी तिची आई घरी आली असता मुलीने दरवाजा उघडला नाही, म्हणून त्यांनी दुसऱ्या चावीने दरवाजा उघडला.

यावेळी लोखंडी ग्रीलच्या छताच्या पत्राच्या खाली लोखंडी रॉडला ओढणीच्या सहाय्याने तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली होती.

याप्रकरणी अधिक चौकशी केली असता ऑक्टोबर महिन्यात शाळेतील वर्गात एका विद्यार्थ्याने पाठीमागून पाठीला हात लावत असलेला फोटो ‘काइन मास्टर’ या व्हिडिओ मेकर ॲपवर एक व्हिडीओ एडिट केला होता

. तसेच खाली अश्लील शब्द लिहून वेगवेगळ्या दोन इन्स्टा आयडीवरून प्रसारित केले. त्यामुळे संगनमत करून १४ वर्षीय तरुणीची बदनामी करून तिचे मानसिक खच्चीकरण केल्याची बाब तपासात समोर आली आहे. याप्रकरणी पनवेल शहर पोलिस ठाण्यात दोघांविरोधात मंगळवारी (ता.२१)गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

IND vs ENG 1st T20I: सॅमसनचा भारी कॅच घेतला, तर नंबर वन ईशान किशनला घाई नडली अन् झाला शुन्यावर रनआऊट; Video

संत सखाराम महाराज संस्थानाला भीषण आग; शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना, भाविकांना तातडीने बाहेर काढलं...

SCROLL FOR NEXT