Prime Minister Narendra Modi acknowledges D.B. Patil’s contribution during the inauguration of the Navi Mumbai International Airport, marking a historic milestone in Maharashtra’s infrastructure journey.

 

esakal

मुंबई

Navi Mumbai Airport Inauguration : नवी मुंबई विमानतळ उद्घाटनप्रसंगी पंतप्रधान मोदींकडून दि.बा.पाटील यांचा विशेष उल्लेख, म्हणाले...

PM Modi’s Address at Navi Mumbai Airport Inauguration: नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटील यांचे नाव दिले जावे अशी मागणी आहे आणि राज्य सरकारही त्यादृष्टीने सकारात्मक दिसत आहे.

Mayur Ratnaparkhe

PM Modi highlights D.B. Patil’s contribution during Navi Mumbai Airport inauguration : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन आज(बुधवार) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले. याप्रसंगी भाषणातून आपले विचार मांडताना पंतप्रधान मोदींनी लोकनेते दि.बा.पाटील यांचा उल्लेख करत, उपस्थितांची मनं जिंकल्याचे दिसून आले.

नवी मुंबई विमानतळास दि.बा.पाटील यांचे नाव दिले जावे अशी मागणी आहे आणि राज्य सरकारही त्यादृष्टीने सकारात्मक दिसत आहे. या पार्श्वभूमीवर आज या विमानतळाच्या उद्घाटन प्रसंगी खुद्द पंतप्रधान मोदींनी दि.बा.पाटील यांचा उल्लेख करून एकप्रकारे अप्रत्यक्षरित्या या मागणीस ग्रीन सिग्लच दिल्याचं बोललं जात आहे.

पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘’आज या अतिशय महत्त्वाच्या क्षणी मी महाराष्ट्राचे सुपुत्र लोकनेते दि.बा.पाटील यांचेही स्मरण करतोय. त्यांनी समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी ज्या सेवाभावाने काम केले. ते आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आहे. त्यांचे जीवन सामाजिक जीवनात काम करणाऱ्यांना नेहमीच प्रेरणा देते राहिले.'’

तत्पूर्वी भाषणाच्या सुरुवातीस मोदी मराठीत म्हणाले, विजयादशमी झाली,कोजागिरी पौर्णिमाही झाली आणि आता दहा दिवासांनी दिवाळी तुम्हाला या सर्वासाठी खूप खूप शुभेच्छा देतो. तसेच पुढे मोदी म्हणाले, मित्रांनो आज मुंबईची प्रदीर्घ प्रतीक्षा संपली आहे. मुंबईला आता आपले दुसरे आंतरराष्ट्रीय विमानतळ मिळाले आहे.

याशिवाय, हे विमानतळ या क्षेत्रास आशियातील सर्वात मोठ्या कनेक्टिव्हिटी हबच्य रूपात स्थापित करण्यात मोठी भूमिका निभावेल. आज मुंबईला पूर्णपणे अंडरग्राउंड मेट्रोही मिळाली आहे. यामुळे मुंबईत प्रवास अधिक सुलभ होईल. लोकांचा वेळ वाचेल. ही अंडरग्राउंड मेट्रो विकसित होणाऱ्या भारताचे जिवंत प्रतीक आहे. असंही मोदींनी यावेळी सांगितलं.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Female News Anchor Suicide : खळबळजनक! महिला न्यूज अँकरची चॅनलच्या ऑफिसमध्येच गळफास लावून आत्महत्या

Smriti - Palash Wedding: 'स्मृतीच्या वडिलांच्या प्रकृतीमुळे...', भाऊ पलाशचं लग्न लांबणीवर पडल्यानंतर पलक मुच्छलची पोस्ट

Sunidhi Chauhan Concert : ‘देसी गर्ल’च्या मैफिलीची उत्सुकता; ‘स्वास्थ्यम्’ मध्ये ६ डिसेंबरला ‘सुनिधी चौहान कॉन्सर्ट’!

Palghar News : मोखाड्यात प्रसुत मातेची बाळाला घेऊन जंगलातुन २ किलोमीटर पायपीट; रूग्णवाहीका चालकाने अर्ध्यावरच सोडल्याने ओढवला प्रसंग!

Latest Marathi News Live Update : देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT