Uddhav Thackeray Eknath Shinde esakal
मुंबई

Navi Mumbai: दिड वर्षे झाली अजून दि.बा.पाटील यांच्या नावाचा पत्ता नाही - उद्धव ठाकरे

नवी मुंबई विमानतळाला मुद्दा पुन्हा चर्चेत

शर्मिला वाळुंज

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि.बा.पाटील यांचेच नाव देण्यात यावे, स्थानिक भूमिपुत्रांच्या मागणीला माझा कधीच विरोध नव्हता. मी त्यांच्या सोबत कायम होतो. मिंधे सरकारच नाटक करत होते, माझ्यावर टाकत होते. बाळासाहेबांचे नाव द्यायचे आहे, दि.बा.पाटलांचे नाव आल्यावर काय ? पण मी स्थानिकांच्या बाजून कायम होतो. आता त्यांचे सरकार आहे, दिड वर्षे झाली अजून दि.बा पाटील यांच्या नावाचा पत्ता नाही.

संभाजी नगर येथील विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज नाव देण्याचे जाहीर केले त्याचा अजून पत्ता नाही असे म्हणत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळ नामांतराचा प्रश्न पुन्हा छेडला आहे

. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या मुद्दयावरुन ठाकरे शिंदे गट यांच्यातील राजकीय वाद पेटण्याची शक्यता नाकारता येत नाही. आगामी लोकसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात येत शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पुन्हा या मुद्द्याला हात घातला आहे.

दिवा येथे बोलताना ठाकरे म्हणाले, आज दि.बा.पाटील यांची जयंती असल्याचे समजते. आपल्या मंत्रीमंडळाने एक निर्णय घेतला होता की नवी मुंबई विमानतळाला पाटील यांचे नाव द्यायचे. या लोकांनी मिधेंनी वगैरे एक नाटक केले होते. माझ्यावर टाकत गेले त्यांना वाटलं बाळासाहेबांचे नाव देतोय मग दि.बांचे नाव आल्यावर काय. त्यांना मी म्हटलं की स्थानिक लोकांच्या मागणी बरोबर मी आहे. आज दिड वर्षे होऊन गेले. दि.बा. पाटील यांच्या नावाचा अजून पत्ता नाही. संभाजी नगरच्या विमानतळाला छत्रपती संभाजी महाराज असे नाव द्या हे आपण जाहीर केले त्याचा अजून पत्ता नाही असे ठाकरे म्हणाले.

काल अटल सेतूचे लोकार्पण केले. अटलजींचा फोटो कोठे आहे ही अटलजींची भाजपा आहे असे ठाकरे म्हणाले. यावर काल कोणीतरी एक बडबडलं. हिंदूहृदयसम्राट समृद्धी महामार्ग आहे, त्यावर बाळासाहेबांचे फोटो कोठे आहेत. तो तुम्हीच उद्घाटन केले आहे, आम्ही केले असते तर आम्ही लावले होते. तेथे बाळासाहेबांना विसरले, येथे अटलजींना विसरले उद्या हे जनता सुखात आहे की दुखात हे विसरतील. आज सुद्धा यांना राम भरोसे रहावे लागते जय श्रीराम..आम्ही पण म्हणतो जय श्रीराम, राम आमच्या हृदयात आहे, तो कोणी काढू शकत नाही असे ही ठाकरे यावेळी म्हणाले.

नवी मुंबई विमानतळ नामकरणाच्या मुद्द्याला हात घालत ठाकरे यांनी ठाणे जिल्ह्यात मुख्यमंत्री शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात येत त्यांनाच टोला लगावला आहे. यामुळे आता हा मुद्दा कोणते राजकीय वळण घेतो हे पहावे लागेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Indian Navy: नववर्षात नौदलाचे सामर्थ्य वाढणार! ‘तारागिरी’, ‘अंजदीप’ युद्धनौका लवकरच सेवेत

Success Story Women Farmers : कोल्हापूर जिल्ह्याच्या शेतीतही महिलाराज; उद्योजकतेचा दिला साज

Latest Marathi News Live Update : नाशिकमध्ये भाजपमधला अंतर्गत वाद उफाळला

Save Tigers: धक्कादायक! देशात १६९ तर राज्यात ४१ वाघांचे मृत्यू; मागील वर्षीच्या तुलनेत यंदा ४५ वाघांचे अधिक बळी..

Sinnar Accident : मोहदरी घाटात काळजाचा थरकाप! कंटेनरने समोरून येणाऱ्या वाहनांना चिरडले; तिघांचा मृत्यू

SCROLL FOR NEXT