Navi Mumbai Crime sakal
मुंबई

Navi Mumbai Crime : शेअर मार्केटमधील गुंतवणुकीच्या अमिषाने डॉक्टर तरुणीकडुन उकळले 2 लाख रुपये

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai News: शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला फायदा मिळवून देण्याचे अमिष दाखवून एका सायबर टोळीने 24 वर्षीय डॉक्टर तरुणीला पैसे पाठविण्यास भाग पाडून तिच्याकडून 2 लाख 4 हजाराची रक्कम उकळल्याचे उघडकीस आले आहे.

नेरुळ पोलिसांनी या प्रकरणातील सायबर चोरटयाविरोधात फसवणुकीसह आयटी ऍक्टनुसार गुन्हा दाखल करुन त्यांचा शोध सुरु केला आहे.

या प्रकरणात फसवणुक झालेली 24 वर्षीय तरुणी डॉक्टर असून ती नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात तसेच एका खाजगी हॉस्पीटलमध्ये प्रॅक्टीस करत आहे. गत 26 फेब्रुवारी रोजी सदर तरुणी नेरुळ मधील आपल्या हॉस्पीटलमध्ये कार्यरत असताना, सायबर चोरटयानी वेगवेगळ्या मोबाईल नंबरवरुन शेअर मार्केटमध्ये गुंतवणुक केल्यास चांगला फायदा मिळवून देण्यासंदर्भात तसेच त्यांच्या ऍपमध्ये गुंतवणुक करण्याबाबतचे मेसेज पाठवून दिले.

त्यामुळे या डॉक्टर तरुणीने सदर मेसेजमध्ये आलेल्या लिंकवर क्लिक करुन एसईआयई नावाचे ऍप डाऊनलोड केले. त्यानंतर या डॉक्टर तरुणीने आपली संपुर्ण माहिती टाकून त्यात बँकेची माहिती सुद्धा भरली.

त्यानंतर सायबर चोरटयानी या तरुणीला गुगल पे मार्फत पैसे पाठवण्यास सांगितले. त्यानुसार या तरुणीने पैसे पाठवण्यास सुरुवात केली. त्यानुसार या तरुणीने 13 दिवसांमध्ये वेगवेगळ्या बँक खात्यामध्ये 2 लाख 4 हजार रुपयांची रक्कम पाठवून दिली. त्यानंतर या तरुणीने ऍपमध्ये आपल्या रक्कमेची पाहणी केली असता, त्यात पैसे भरल्याचे दिसत नसल्याचे आढळून आले.

त्यामुळे या तरुणीने सायबर चोरटयाच्या मोबाईलवर संपर्क साधला असता, त्यांचे मोबाईल फोन बंद असल्याचे आढळून आले. त्यानंतर आपली फसवणुक झाल्याचे या तरुणीच्या लक्षात आले. दरम्यानच्या काळात या तरुणीची वैद्यकीय परिक्षा असल्याने तीने त्यावेळी तक्रार दाखल केली नाही. मात्र गत 8 जून रोजी या तरुणीने नेरुळ पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC चा पेपर कसा फुटला? प्रेमात बिनसलं अन् प्रियकरानेच आयोगाला केला ई-मेल... प्रेमापासून ब्रेकअपपर्यंतची धक्कादायक कहाणी

BABAR AZAM T20I RECORD: बाबर आझमचा मोठा विक्रम; रोहित शर्मा अन् विराट कोहलीला मागे टाकत टी-२०मध्ये ठरला नंबर वन

Ajra Bank Employee Tragedy: आजऱ्यात विजेच्या धक्क्याने बॅंक कर्मचाऱ्याचा मृत्यू बांधकामावरील साहित्य उचलताना घटना

Onion Express: लासलगाव ‘कांदा एक्स्प्रेस’चा उडाला बोजवारा! ढिसाळ नियोजन; निम्माच माल घेऊन गाडी ४२ तासांनी दिल्लीकडे रवाना

Chandwad Teacher Vacancies: चांदवडला शिक्षकांची ५५ पदे रिक्त; तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांची स्थिती दयनीय; पालक संतप्त

SCROLL FOR NEXT