Navi Mumbai Crime:  sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: वकिलाचा प्रताप! तरुणीवर लैंगिक अत्याचार, व्हिडिओ शूट करून बड्या नेत्याला ब्लॅकमेल, उकळले 2 कोटी

Lawyer Sexually assaulted 21 year old young girl Of navi Mumbai: वकिलाने या प्रकाराची कुणाला माहिती दिल्यास तिला व तिच्या आईला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

सकाळ वृत्तसेवा

Andheri Crime: ऐरोलीत राहणाऱ्या एका २९ वर्षीय तरुणीवर अंधेरीतील एका वकिलाने त्याच्या कारमध्ये लैंगिक अत्याचार करून त्याचे स्पाय कॅमेऱ्याने चित्रीकरण केल्याचे उघडकीस आले आहे.

या घटनेनंतर आरोपीने हा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत पीडितेला नवी मुंबईतील एका बड्या राजकीय नेत्याविरोधात बलात्काराची खोटी तक्रार देण्यास भाग पाडून या नेत्याकडून पीडितेच्या नावाने तब्बल दोन कोटी ७० लाख रुपये उकळल्याचे उघडकीस आले आहे. अली काशीफ खान देशमुख असे या वकिलाचे नाव असून रबाळे पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

पीडित २९ वर्षीय तक्रारदार तरुणी आईसह ऐरोलीत राहण्यास असून वर्षभरापूर्वी तिने आपल्या आईच्या घटस्फोट प्रकरणात अंधेरी येथील वकील अली काशीफ खान देशमुख याची भेट घेतली होती. या तरुणीचे नवी मुंबईतील एका बड्या राजकीय नेत्यासोबत चांगली ओळख असल्याचे या वकिलाला समजले.

त्यानंतर गेल्या जानेवारीमध्ये एका रात्री उशिरा हा वकील ऐरोलीत पीडित तरुणी राहत असलेल्या भागात आला होता. त्यावेळी त्याने पीडित तरुणीला महत्त्वाचे बोलायचे आहे, असे सांगून तिला भेटण्यासाठी बोलावून घेऊन तिला आपल्या कारमधून ऐरोली सेक्टर-१० मधील निर्जन ठिकाणी नेले.

यावेळी आरोपीने पीडित तरुणीला कोल्ड्रींगमधून गुंगीचे द्रव्य पाजून तिच्यावर कारमध्येच लैंगिक अत्याचार केला. या घटनेचे त्याने कारमधील कॅमेऱ्याद्वारे चित्रीकरण केले. त्यानंतर आरोपीने पहाटे दोन वाजता पीडित तरुणीला घरी आणून सोडले. यावेळी आरोपी वकिलाने या प्रकाराची कुणाला माहिती दिल्यास तिला व तिच्या आईला जिवे ठार मारण्याची धमकी दिली.

दरम्यान, फेब्रुवारीमध्ये या अत्याचाराचा व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देच आरोपी वकिलाने पीडित तरुणीला एका राजकीय नेता व त्याचा मुलाविरोधात अंबोली पोलिस ठाण्यात बलात्काराची खोटी तक्रार देण्यास पाठवून दिले होते. त्यानंतर या वकिलाने या नेत्याकडून पीडित तरुणीच्या नावाने तब्बल दोन कोटी ७० लाख रुपये उकळले.

अर्धी रक्कम देण्याच्या बहाण्याने पुन्हा अत्याचार

आरोपीने राजकीय नेत्याकडून उकळलेली अर्धी रक्कम देण्याच्या बहाण्याने पीडित तरुणीला मार्चमध्ये आपल्या सांताक्रूझ येथील घरी बोलावून घेतले. त्याहीवेळी या वकिलाने पीडितेवर जबरदस्तीने लैंगिक अत्याचार केले. अखेर पीडित तरुणीने रबाळे पोलिस ठाणे गाठत आरोपी वकील अली काशीफ खान देशमुखविरोधात तक्रार दाखल केली. पोलिसांनी या तक्रारीच्या आधारे आरोपीविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

रशियन तेल खरेदी करणाऱ्यांवर अमेरिकेकडून शंभर टक्के टॅरिफ; ट्रम्प यांच्या प्लॅनवर भारताची पहिली प्रतिक्रिया

Koyna Dam: कोयना धरणाचा मध्यरात्री मोठा विसर्ग! 23,520 क्युसेक पाणी नदीत; कृष्णा-कोयना काठावरील गावांना अलर्ट

Commonwealth Games 2026: भारताची 'ज्युदो'त पदक हॅटट्रिक! LIC एजंटच्या लेकीच्या जिद्दीला सलाम; कोण आहे यामिनी मौर्य?

Leopard Attack: श्वानाच्या धाडसाने बिबट्याला पळवले! पुरंदरात कालवडीवरचा हल्ला फसला, मध्यरात्री रंगला थरार..

Cultural Heritage: मुसळधार पावसाचा सांस्कृतिक वारशाला तडा! कवयित्री शांता शेळके यांच्या ऐतिहासिक वाड्याचा भाग कोसळला

SCROLL FOR NEXT