Navi Mumbai police  sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: अब पत्ताभी नही हिलेगा; गुन्हेगारांवर पोलिसांची करडी नजर

पोलिसांची धडाकेबाज कारवाई; निवडणुकीपूर्वी गुन्हेगारीवर नियंत्रणाचे ठोस पाऊल

सकाळ वृत्तसेवा

Navi Mumbai Crime: आगामी वर्ष निवडणुकांचे असल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे. अशातच राजकीय वरदहस्तामधून नवी मुंबईत गुन्हेगारी डोके वर काढत आहे.

गल्लीबोळातील या टोळ्यांचा वापर करून मतदारांमध्ये दहशत निर्माण करण्याचे प्रकार होण्याची शक्यता असल्याने नवी मुंबई पोलिसांनी गुन्हेगारांच्या टोळ्यांचा आढावा घेण्यास सुरुवात केली आहे.

नवी मुंबई महापालिकेच्या दक्षिण विभागांमध्ये यापूर्वी पाच नगरसेवकांची हत्या झाली आहे, तर काही नगरसेवकांच्या हत्येचा कट फसला आहे. त्यामुळे निवडणुकीदरम्यान सामाजिक प्रतिष्ठेच्या नादात राजकीय वैमनस्यामध्ये झालेली वाढ नवी मुंबईकरांसाठी नवीन नाही.

अनेक वेळा वर्चस्वातून राजकीय पक्षातील कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या आहेत, तर जीवघेणे हल्लेही झाले आहेत. त्यामुळे राजकीय नेत्यांकडून गुन्हेगारांना आश्रय दिला जात आहे. त्यामुळे वाढत्या गुन्हेगारीमुळे नवी मुंबई पोलिसांसमोर निवडणुकांमध्ये आव्हाने उभे राहणार आहे.

तरुणवर्गाला भुरळ

सद्यस्थितीत जामिनीवर सुटलेले गुन्हेगार बड्या राजकीय नेत्यांच्या आशीर्वादाने राजकारणात व्हाईट कॉलर बनण्याचा प्रयत्न करत आहेत. सण, उत्सव वाढदिवसाचे निमित्त साधत बेकायदा फलकबाजी करून स्वतःचे अस्तित्व निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, तर युवा वर्गातही भाईगिरी करणाऱ्या या गुन्हेगारांची भुरळ असल्याने अनेकजण गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकत आहेत.

उद्योग क्षेत्रात वर्चस्वासाठी चढाओढ

नवी मुंबईतील वाढते औद्योगिकीकरण, आयटी कंपन्या, डाटा सेंटर, गोदामांमध्ये काम मिळवण्याच्या स्पर्धेतून निर्माण करण्यासाठी गुन्हेगारी पार्श्वभूमीचे आरोपी स्वतःचे प्रस्थ वाढवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये अशा छोट्या-मोठ्या टोळ्यांना हाताशी धरत राजकीय हेतू साध्य केले जात आहेत. त्यामुळे गुन्हेगारी घटनांचे प्रमाण वाढले असून येणाऱ्या निवडणुकांमध्ये या टोळ्यांचा वापर करण्यासाठी राजकीय नेतेदेखील सक्रिय असल्याची चर्चा नवी मुंबईकरांमध्ये रंगली आहे.

हत्यासत्रांची राज्यभरात चर्च

- नवी मुंबईमध्ये सर्वप्रथम १४ गाव विभागाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या अनंता भोईर यांची हत्या झाली. यानंतर ऐरोलीमधील नगरसेवक पप्पू ऊर्फ प्रदीप सावंत यांची हत्या झाली. याच परिसरामधील नगरसेविका मीना मोरे यांच्या हत्येची घटना राज्यभर गाजली होती, तर ऐरोलीमधील नगरसेवक देविदास चौगुले यांची २००७ मध्ये दिवाळीमध्ये हत्या झाली. काँग्रेसचे नगरसेवक आनंद काळे यांची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. आतापर्यंत पाच नगरसेवकांची हत्या झाली असून चार जण ऐरोली, दिघा परिसरातील रहिवासी होते.

- नगरसेवकांबरोबर अनेक राजकीय कार्यकर्त्यांच्या हत्येच्या घटनाही राज्यभर गाजल्या आहेत. नवी मुंबईच्या वेशीवरील कळवा येथील कुख्यात गुंड जगदीश तांडेल याच्या हत्येनंतर आरोपी सुजित सुतार, अन्नू आंग्रे, राजा गवारी यांनी आपली दहशत बसवण्याचा प्रयत्न केला होता; तर राष्ट्रवादी काँग्रसचे घणसोलीमधील नगरसेवक संजय पाटील, माजी विरोधी पक्षनेते विजय चौगुले, तसेच ज्येष्ठ नगरसेवक अनंत सुतार यांच्यावरही हल्ला झाला होता.

नवी मुंबईत गुन्हेगारांना रोखण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. तसेच आगामी निवडणुकांच्या काळात जर कोणी दहशत निर्माण करायचा प्रयत्न केला तर अशा गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

- मिलिंद भारंबे, आयुक्त, नवी मुंबई पोलिस

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

What is the E20 Petrol Mandate 2026? पेट्रोलचे नियम बदलणार! तुमच्या गाडीत 'हे' इंधन भरण्यापूर्वी ही बातमी नक्की वाचा, अन्यथा...

श्रीदेवींच्या निधनामागे स्ट्रिक्ट डायट कारणीभूत? बोनी कपूरांचा खुलासा, म्हणाले...'ती मीठचं खात नव्हती'

HSC Exam Paper Leak : केमिस्ट्री, फिजीक्सनंतर बारावीचा गणिताचा पेपर फुटला; नागपुरात घडला प्रकार, सीलबंद लिफाफ्यातून प्रश्नपत्रिका गायब?

Medha Mankumre Point Accident : मेढ्यातील मानकुमरे पॉइंटजवळ उलटली कार; पाचवड-खेड हायवेवर नेमकं काय घडतंय? ठेकेदाराच्या 'या' चुकीमुळे प्रवाशांचा जीव धोक्यात!

Marathi Bhasha Gaurav Din: 27 फेब्रुवारीलाच का साजरा केला जातो मराठी भाषा गौरव दिन? जाणून घ्या महत्त्व आणि इतिहास

SCROLL FOR NEXT