crime news jail  sakal
मुंबई

Navi Mumbai Crime: घरफोडी करणाऱया सराईत दुक्कलीला पोलिसांनी केली अटक!

पोलिसांची मोठी कामगिरी: रबाळे पोलिसांनी सराईत चोरट्यांना केली जेरबंद

सकाळ वृत्तसेवा

Rabale Police: चोरी, घरफोडी करणाऱया दोन सराईत चोरटयाना रबाळे पोलिसांनी अटक केली आहे. हुसेन कमरुद्दीन शेख (23) व अजीम उर्फ मुन्ना सलीम शेख (19) अशी या चोरटयाची नावे असून त्यांनी रबाळे, रबाळे एमआयडीसी व तुर्भे एमआयडीसीच्या हद्दीत केलेले एकुण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत.

या चोरटयाकडुन ऑटो रिक्षा व चोरी केलेल्या 4 बॅटऱया इतर साहीत्य असा सुमारे 1 लाख 78 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांनी यश आले आहे.

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या चोरटयानी गत 28 जानेवारी रोजी मध्यरात्री ऑटो रिक्षाने घणसोली सेक्टर-15 मध्ये जाऊन त्याभागात रस्त्यालगत उभ्या असलेल्या डंम्परमधील 2 बॅटरी चोरी करुन नेले होते.

त्याचप्रमाणे या चोरटयानी साईबाबा मंदीरातील दानपेटी फोडुन त्यातील पैसे चोरुन नेले होते. याबाबत रबाळे पोलीस ठाण्यात गुह्यांची नोंद झाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱयांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे रबाळे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजीव धुमाळ यांनी डी.बी. पथकातील अधिकारी व अंमलदार यांना मार्गदर्शन करुन या गुह्यातील आरोपींचा शोध घेण्याच्या सुचना दिल्या होत्या. त्याअनुषंगाने डी.बी पथकाने गुन्हयाच्या घटनास्थळी भेट देवुन सीसीटिव्ही फुटेज प्राफ्त केले.

तसेच गोपनीय बातमीदारांकडुन माहीती प्राफ्त करुन आरोपी हुसेन कमरुद्दीन शेख याला घणसोलीतील टेमटेशन हॉटेल समोरुन ताब्यात घेतले. त्यानंतर पोलिसांनी त्याचेकडे अधिक चौकशी केली असता, त्याने अजीम उर्फ मुन्ना या रिक्षा चालकासह डंम्परच्या बॅटऱया व साईबाबा मंदीरातील दानपेटी फोडून त्यातील पैसे आपसात वाटुन घेवुन मौजमजा केल्याची कबुली दिली.

त्यानंतर पोलिसांनी अजीम उर्फ मुन्ना याला कोपरखैरणे परिसरातून अटक केली. त्यानंतर त्यांनी गुन्हा करण्यासाठी वापरलेली ऑटो रिक्षा व चोरी केलेल्या 4 बॅटऱया व इतर साहीत्य पोलिसांनी जफ्त केले. या आरोपीच्या चौकशीत रबाळे, रबाळे एमआयडीसी व तुर्भे एमआयडीसीच्या हद्दीत केलेले एकुण 4 गुन्हे उघडकीस आले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NZ: Virat Kohli त्याचे सामनावीर ट्रॉफी कुठे ठेवतो? न्यूझीलंडविरुद्ध पुरस्कार जिंकल्यानंतर सांगून टाकलं

WPL 2026, DC vs GG: १ बॉल अन् ५ धावा... गुजरात जायंट्सने मिळवला थरारक विजय, जेमिमाच्या दिल्लीचा सलग दुसरा पराभव

२०१४पासून अदानीकरण! हे बघून भीती वाटली नाही तर निवडणूक न लढलेली बरी; राज ठाकरेंनी दाखवले VIDEO

Bigg Boss Marathi 6: ९० दिवस, १७ स्पर्धक; पाहा 'बिग बॉस मराठी ६' च्या घरातील स्पर्धकांची यादी

अजित पवारांना लाथ मारून हाकला किंवा माफी मागा, गाडीभर पुरावे कोर्टात द्या; भ्रष्टाचारावरून ठाकरे बंधूंनी फडणवीसांना घेरलं

SCROLL FOR NEXT