Culprit arrested sakal media
मुंबई

नवी मुंबई : किरकोळ कारणावरुन हमालाने कानाला चावा घेऊन तुकडा पाडला

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका हमालाने (coolie) एपीएमसीच्या दाणा मार्केटमधील (APMC Market) एका व्यापाऱ्याकडे कामाला असलेल्या कर्मचाऱ्याला मारहाण केली आणि त्‍याच्या कानाचा चावा घेत (worker ear bite) तुकडा पाडल्याची घटना घडली. रमेस चव्हाण असे हमालाचे नाव असून एपीएमसी पोलिसांनी (APMC Police) त्याला अटक केली (culprit arrested) आहे.

राजेश भानुशाली (४५) हा मुलुंड येथे राहत असून तो एपीएमसीतील दाणा मार्केटमधील व्यापाऱ्याकडे कामाला आहे. २९ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ट्रकमध्ये तांदूळ भरण्यासाठी रमेश चव्हाण हा हमाल भानुशाली काम करत असलेल्या व्यापाऱ्याकडे गेला होता. त्यावेळी भानुशाली याने चव्हाणला ज्या ट्रकमध्ये तांदळाच्या गोण्या भरण्यास सांगितल्या होत्या, त्या ट्रकमध्ये गोण्या न भरता, त्याने दुसऱ्याच ट्रकमध्ये भरल्या. तसेच २० रुपये किलोच्या तांदळाची मागणी करणाऱ्या ग्राहकाला त्याने ५० रुपये किलोचा तांदूळ दिल्याने राजेश भानुशाली त्याच्यावर रागावला होता.

त्यामुळे चव्हाणला राग अनावर झाल्‍याने त्याने भानुशालीला शिवीगाळ करून मारहाण केली. दोघांमध्येही हाणामारी झाल्‍याने चव्हाणने भानुशालीच्या डाव्या कानाला चावा घेऊन तुकडा पाडला. त्यानंतर तेथील इतर कर्मचाऱ्यांनी भानुशालीला वाशीतील रुग्‍णालयात दाखल केले. आणि हमाल रमेश चव्हाणला एपीएमसी पोलिसांच्या स्वाधीन केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra: मान्सून जैसे थे! मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी पावसाचा अंदाज; विदर्भात उष्ण लाटेचा इशारा

Shaktipeeth Highway Protest : शक्तिपीठ महामार्गाविरोधात हरकतींचा पाऊस; शेतकरी आक्रमक, ऐतवडे खुर्दमधील 182 एकर सुपीक जमीन होणार बाधित

SAFF Women Football: 'त्या' दोन पराभवांचा बदला घेणार? भारतीय महिला फुटबॉल संघासमोर बांगलादेशचे तगडे आव्हान; आजपासून थरार!

Pimpri: उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने;उद्योगनगरीत मेट्रोचा विस्तार कासवगतीने

Latest Marathi News Live Update : पुणे शहरात उद्यापासून प्रतिबंधात्मक आदेश लागू; परवानगीशिवाय सभा, मिरवणुकांना बंदी

SCROLL FOR NEXT