money fraud sakal media
मुंबई

नवी मुंबई : उलवेतील तरुणाला सव्वा तीन लाखांचा गंडा

ऑनलाईन गुंतवणुकीच्या बहाण्याने फसवणूक

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : ई-कॉमर्स मार्केटिंगमध्ये (E-commerce marketing) पैसे गुंतवणूक (money investment) जास्त परतावा देण्याचे प्रलोभन दाखवून एकाने उलवेतील तरुणाची तब्बल सव्वा तीन लाख रुपयांची फसवणूक (money fraud) केल्याची घटना उघडकीस आली आहे. न्हावा शेवा पोलिसांनी (nhava sheva police) या प्रकरणी गुन्हा दाखल (police fir) केला आहे.

त्रिदिवेश सातोपती (३१) हा उलवे सेक्टर-९ मध्ये राहत असून तो आयटी कंपनीत कामाला आहे. १ नोव्हेंबर रोजी त्रिदीवेश याच्या व्हॉट्सऍपवर एका व्यक्तीने पार्ट टाइम जॉबबाबत जाहिरात पाठविली होती. त्यात ५ हजार रुपये ई-कॉमर्स मार्केटिंगमध्ये गुंतवणुक केल्यास रोज ६०० ते ९०० रुपये मिळतील, अशी माहिती दिली. त्रिदिवेशने गुंतवणुकीची तयारी दाखविल्यानंतर समोरील व्यक्तीने त्‍याला लिंक पाठवून पैसे भरण्यास सांगितले. त्रिदिवेशने ४६०० रुपये भरल्यानंतर दोन तासात त्याला परतावा मिळणार असल्याचे सांगून त्याला बँक अकाउंटची माहिती भरण्यास सांगण्यात आले.

त्रिदिवेशने बँक खात्याची माहिती भरून चार टप्प्यात एकूण ४,१९८ रुपयांची रक्कम पाठवली. त्यानंतर सायबर गुन्हेगाराकडून पैसे कसे कमवायचे याची माहिती व्हॉट्सऍपद्वारे देण्यात आली. सदर व्यक्‍तीने आपली ओळख सांगताना, इंदिरा इलुमलाई अचारी या महिलेचे पॅन कार्ड व्हॉट्सऍपवर पाठवले. दोन दिवसानंतर त्रिदिवेशने किराणा दुकानादाराला ऑनलाईन पैसे पाठविण्याचा प्रयत्न करत असताना, त्याच्या फोन-पेमध्ये पैसे नसल्याचे कळले.

त्यामुळे त्याने आपल्या दोन्ही बँकेच्या खात्यांची तपासणी केली असता, त्याच्या बँक ऑफ इंडियाच्या खात्‍यातून १ लाख १४ हजार रुपये तर एचडीएफसी बँकेमधून २ लाख ११ हजार रुपये असे एकूण सव्वा तीन लाख रुपये काढुन घेण्यात आल्याचे त्याला समजले. त्रिदीवेशने गुंतवणूकीचे ऑफर देणाऱ्या व्यक्‍तीशी संपर्क करण्याचा प्रयत्‍न केला असता, फोन बंद होता. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्‍याने न्हावा शेवा पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs WI 1st Test Live: KL Rahul ने शतकानंतर का वाजवली शिट्टी? या नव्या सेलिब्रेशनमागचं नेमकं कारण काय?

Video : राजेशच राकेश असल्याचं सत्य ईश्वरीसमोर उघड ! प्रोमो पाहून प्रेक्षक म्हणाले "आता तरी तिला अक्कल येऊ दे"

IND vs WI 1st Test Live: अरे आताच फिफ्टी झाली होती, कशाला घाई केली! Shubman Gill चा चुकीचा फटका अन् विंडीजला मिळाली विकेट

Dmart Offers : दसरा स्पेशल! डीमार्टमध्ये 'या' वस्तू मिळतायत जास्त स्वस्त, पुढचे 4 दिवस डिस्काउंट ऑफर, पाहा एका क्लिकवर..

OBC Scholarship Schemes : १०वी, १२वीच्या ओबीसी विद्यार्थ्यांना मिळते शासनाची शिष्यवृत्ती, सरकारच्या 'या' ८ योजना जाणून घ्या....

SCROLL FOR NEXT