Bribe crime sakal media
मुंबई

नवी मुंबई : लाच मागितल्याप्रकरणी दोन पोलिसांवर गुन्हा

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : अमली पदार्थ विरोधी पथकातील (NCB) आणखी दोघा पोलिस कर्मचाऱ्यांनी पान मसाला विक्रेत्याकडे गुटखा आणि पान मसाल्याचा धंदा सुरू ठेवण्यासाठी दरमहा १५ हजार रुपये लाचेची मागणी (Bribe crime) केल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे एसीबीने (ACB) या दोन पोलिस कर्मचाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल (police FIR) केला.

या कारवाईत गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमध्ये पोलिस शिपाई बाबासाब मधु सांगोलकर व पोलिस हवालदार इक्बाल बशिर शेख या दोघांचा समावेश असून हे दोघेही नवी मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकात कार्यरत आहेत. या प्रकरणातील तक्रारदार मोहम्मद फैज निजामुद्दीन सय्यद हा सीवूड्स मध्ये राहाण्यास असून त्याचा पान मसाला व गुटखा विक्रीचा व्यवसाय आहे.

अमली पदार्थ विरोधी पथकाला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर या पथकातील पोलिस कर्मचारी सांगोलकर आणि शेख या दोघांनी मोहम्मद फैज याला पान मसाल्याचा व्यवसाय पुढे सुरू ठेवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्याला दरमहा १५ हजार रुपये द्यावे लागतील, असे सांगितले होते. त्यामुळे मोहम्मद फैज याने लाच प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Chandrashekhar Bawankule : मुख्यमंत्री फडणवीस केंद्रीय मंत्री तर बावनकुळे मुख्यमंत्री? स्वत: मंत्री बावनकुळेंनींच दिलं स्पष्टीकरण

NGO साठी सुवर्णसंधी! HCL Foundation देणार 24 कोटी रुपयांचे अनुदान; अर्ज प्रक्रिया सुरू, पाहा सविस्तर

Latest Marathi News Update: पालखी सोहळ्यात भाविकांचे लाखोंचे दागिने, मोबाईल चोरीस

Horoscope : उद्या बनतोय दुर्मिळ दशकीर्ती योग! 'या' 5 राशी होणार मालमाल; करिअर-व्यवसायात भरभराट, आरोग्याची मोठी समस्या होणार दूर

Mansoon Romance : दहावी, करिअर, गोंधळलेलं मन आणि ‘गारवा’ अल्बम...

SCROLL FOR NEXT