found dead body in vashi khadi police navi mumbai crime esakal
मुंबई

Navi Mumbai: दिवसा घरफोडी करणारी आंतरराज्य टोळी अटकेत

सकाळ वृत्तसेवा

सुरक्षारक्षक नसलेल्या इमारतीतील बंद सदनिका हेरून दिवसा घरफोडी करणाऱ्या आंतरराज्य टोळीतील दुकलीला सानपाडा पोलिसांनी अहमदाबाद येथून अटक केली आहे. अकबर ऊर्फ फिरोज ऊर्फ बाबू सुलतान रफीक सैफी (वय ३९) व रमेशकालू बैसाखीराम राजपूत (वय ४८) अशी या सराईत चोरट्यांची नावे असून हे चोरटे रेल्वेने दिल्ली, उत्तर प्रदेश येथून मुंबईत फक्त घरफोडी करण्यासाठी येत असल्याचे तपासात निष्पन्न झाल.

या प्रकरणात अटक आरोपी दिल्ली व उत्तर प्रदेश राज्यातील असून ते दिल्ली, उत्तर प्रदेश येथून मुंबईत फक्त घरफोडी करण्यासाठी येत होते. घरफोडीत मिळालेला ऐवज घेऊन ते पुन्हा दिल्लीत जात होते. फेब्रुवारी २०२३ मध्ये या टोळीने सानपाडा सेक्टर-५ मधील त्रिमूर्ती अपार्टमेंटमधील गुरुनाथ पडेलकर यांच्या बंद घरातील दागिने व रोख रक्कम असा तब्बल ६ लाख ३५ हजार रुपये किमतीचा ऐवज लंपास केला होता.

सानपाडा पोलिस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजवरुन माग काढण्यास सुरुवात केली होती. त्यानुसार सानपाडा पोलिसांच्या पथकाने या प्रकरणाचा तपास करत बातमीदारांच्या मदतीने या गुन्ह्यातील दोन आरोपींना अहमदाबाद येथून ताब्यात घेतले. त्यांच्याकडून २ लाख ५४ हजार रुपये किमतीची सोन्याची दागिने जप्त करण्यात आले आहेत. या चोरट्यांविरोधात वेगवेगळ्या राज्यात दिवसा घरफोडीचे अनेक गुन्हे दाखल असल्याचे तपासात आढळून आले आहे.

आरोपींविरोधात रबाळे, दादर, वनराई, नालासोपारा, अहमदाबाद, गुजरात, दिल्लीतील विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. या टोळीतील इतर दोन आरोपी तरुण चौधरी व किशन हे फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध घेण्यात येत आहे. या टोळीकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.
- विवेक पानसरे, पोलिस उपायुक्त, परिमंडळ-

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT