मुंबई

Navi Mumbai: मराठी पाट्या तर लागल्या मात्र व्याकरणाची होत आहे बोंब तर अर्थाचा अनर्थ

सकाळ डिजिटल टीम

सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश दिले होते. या निर्णयाची अंमलबजावणी सर्वच स्तरावरून सुरू आहे. नवी मुंबई महापालिकेने देखील दुकानदारांना नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे शहरात ठिकठिकाणी दुकानांची नावे मराठीत भाषांतरित करण्याचे काम सुरू आहे. परंतु, व्याकरणातील प्रचंड चुका, देवनागरी लिपीचा घोळ, व्यापारी आणि नागरिकांमध्ये असलेला जागरूकतेच्या अभावामुळे दुकानांवरील मराठी पाट्यांमधील नावांच्या अर्थाचा अनर्थ हास्यास्पद ठरत आहे.

नवी मुंबई हे एक मोठे व्यापारी केंद्र म्हणून ओळखले जाते. वाशी सारखी मोठी बाजारपेठ आहे. येथे राज्यातून आणि राज्याबाहेरूनही व्यापारी, विक्रेते, खरेदीदार येत असतात. या व्यापारावर मराठी माणसांव्यतिरिक्त इतर भाषिक व्यापाऱ्यांची मक्तेदारी दिसून येते. त्याचा थेट परिणाम दुकानांवरील मराठी पाट्यांवर होताना दिसत आहे.

दुकानाचे मालक नामफलक बनवणाऱ्या व्यक्तीला ज्या शब्दात दुकानाचे नाव लिहून देतात, त्याच शब्दात नामफलक छापला जात आहे. परिणामी, व्यापाऱ्यांनी लिहून दिलेल्या मोडक्या-तोडक्या भाषेत आणि चुकीच्या व्याकरणाप्रमाणेच नामफलक छापला जाऊन दुकानांच्या नावाचा अर्थ, उच्चार यामध्ये तफावत आणि बदल घडून आलेला दिसतो. त्यामुळे दुकान मालक, व्यापारी आणि नामफलक लिहिणाऱ्यांचे मराठी भाषेबद्दल जागृत करणे आवश्यक झाले आहे.

शब्दशः भाषांतरामुळे फजिती

नवी मुंबईत मराठी पाट्यांच्या निर्णयाची चांगल्या प्रकारे अंमलबजावणी होत आहे. शहरातील जवळपास ९० टक्के दुकानांवर मराठीत नामकरण केलेल्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. मात्र, या पाट्या मराठीत नसून देवनागरी लिपीतील असल्याने मोठा घोळ झाला आहे. कारण दुकानाचे इंग्रजीत असलेले नावाच्या मराठीतील शब्दशः भाषांतरामुळे मोठी फजिती होत आहे. उदाहरणार्थ. जर एखाद्या दुकानाचे नाव इंग्रजी भाषेतील शी (She)असे आहे. मात्र, मराठीत भाषांतर केल्याने या शब्दाचा अर्थ दुर्गंधी असा होत आहे. त्यामुळे दुकानदारांकडून व्यवसाय करण्यापलीकडे मराठी भाषा किंवा अर्थाच्या अनर्थाकडे दुर्लक्ष करताना दिसत आहेत.

हिंदी भाषेचा प्रभाव

मराठी आणि हिंदी या दोन्ही भाषा बोलण्यात आणि उच्चारात जरी वेगवेगळ्या असल्या तरीही त्यांची लिहिण्याची लिपी ही एकच म्हणजे देवनागरी लिपी आहे. त्यामुळे दोन्ही भाषांमध्ये लिहिण्यात काही शब्द सोडले तर बऱ्यापैकी साम्य आढळते. उदाहरणार्थ भोजन हा शब्द दोन्ही भाषांत एकसारखाच लिहिला आणि उच्चारला जातो. दुग्धालय हा शब्दही दोन्ही भाषेत सारखाच येतो. त्यामुळे कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार दुकानांच्या पाट्या मराठीत असणे अपेक्षित आहे. मात्र, हिंदी आणि मराठी भाषेची लिपी एक असल्यामुळे या पाट्या मूळच्या हिंदी भाषा आणि हिंदी व्याकरणानुसारच लिहिल्या गेल्या असल्याचे आढळत आहे.

व्याकरणातील चुका वादाचा विषय

मराठी भाषा ही अतिशय समृद्ध असून आहे. अनेक भाषांतील पर्यायी शब्द उपलब्ध आहेत. त्याचसोबत मराठी ही व्याकरणात सुद्धा परिपूर्ण असलेली भाषा मानली जाते. मात्र, मराठीत लागलेल्या दुकानांवरील पाट्या वाचल्या लिहिणाऱ्याचे आणि ते लिहिल्यावर चुकीचे असून मान्य करणाऱ्यांचे व्याकरण सध्या वादाचा विषय ठरण्याची शक्यता आहे. त्यामुळे अशा प्रकारच्या अनेक चुका मान्य करण्यापेक्षा प्रशासकीय पातळीवर मराठी पाट्या बदलताना त्यातून भाषेचा अपमान होणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे.

नवी मुंबईसारख्या शहरात विविध प्रातांतील माणसे राहतात. त्यामुळे दुकानांवर मराठी पाट्यांचा सक्ती करणे, मला आततायीपणाचे वाटते. त्यापेक्षा सरकारने काही ठोस पावले उचलून शिक्षण पद्धतीत आणि रोजगारात मराठीला महत्त्व मिळवून देणे गरजेचे आहे.

- आमोद पुळेकर, रहिवासी

मी मराठी भाषा सक्तीची असावी, या मताचा आहे. मराठी बोलणे किंवा टिकवणे हे फक्त सरकारचे काम नसून मराठी माणसांनी यासाठी काम करणे आवश्यक आहे. आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत न घालता त्यांना मराठी शाळेतून शिक्षण देणे गरजेचे आहे.

- श्रेयस नाईक, रहिवासी

मराठी पाट्यांमुळे चांगली गोष्ट झाली म्हणजे जागोजागी मराठीचा प्रसार होताना दिसतो आहे. मात्र, व्याकरणातील चुका आणि शब्दांचे अर्थ दुरुस्त करणे गरजेचे आहे. अन्यथा मराठी भाषा सुधारण्यासाठी वेगळं आंदोलन करावं लागेल.

- विकास इंगळे, रहिवासी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT