मुंबई

Navi Mumbai Metro : उद्घाटनाविनाच धावणार नवी मुंबईची मेट्रो; मुख्यमंत्र्यांचे आदेश

संतोष कानडे

नवी मुंबईः उद्घाटनामुळे मागच्या दहा महिन्यांपासून रखडलेली नवी मुंबई मेट्रो अखेर शुक्रवारी धावणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदेश दिल्यानंतर विनाउद्घाटन मेट्रो सुरु होत आहे. शुक्रवारी बेलापूर ते पेंधर या मार्गावरुन मेट्रो धावेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते नवी मुंबई मेट्रोचं उद्घाटन व्हावं, अशी राज्य सरकारची इच्छा होती. मात्र मागच्या १० महिन्यांपासून पंतप्रधानांची तारीख निश्चित होत नव्हती. दुसरीकडे नवी मुंबईकर या मेट्रोच्या प्रतीक्षेत होते. शेवटी उद्यापासून मेट्रो प्रवाशांच्या सेवेमध्ये असणार आहे.

नवी मुंबई मेट्रोचा प्रोजेक्ट मागच्या तेरा वर्षांपासून रखडला होता. कसाबसा प्रोजेक्ट पूर्ण झाला परंतु उद्घाटनाअभावी दहा महिने प्रवाशी ताटकळले. पंतप्रधानांच्या तारखेचा हट्ट सरकारचा होता. मात्र आता तारीख निश्चित होत नसल्याने ही मेट्रो धावणार आहे.

नवी मुंबई मेट्रो बेलापूर ते तळोजा या मार्गावर धावेल. या मार्गांवर ११ स्टेशन्स असतील. शेवटी बेलापूरपर्यंत प्रवाशांना प्रवास करता येईल. बेलापूर लोकल स्टेनशवरुन पुढे प्रवाशांना आवश्यकतेनुसार प्रवास करता येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने मेट्रो सुरु होत आहे. 'एबीपी माझा'ने हे वृत्त दिले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ठाणे हादरलं! ठाकरे गटाच्या नेत्यावर झाडल्या गोळ्या, उपचारावेळी मृत्यू

लालबाग राजाच्या चरणी भक्तांनी भरभरून दिलं दान; १२ दिवसात कोट्यवधींची रोकड

Exam Fee : दुष्काळग्रस्त भागातील दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्क माफी

Motorcycle Accident : मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन दोन जण ठार :एक जखमी

CSK च्या कोचिंग स्टाफमध्ये बदलाचे वारे! झहीरपाठोपाठ माजी वेगवान गोलंदाजाचीही संघात एन्ट्री

SCROLL FOR NEXT