मुंबई

नवी मुंबईतून मुंबई, अलिबाग प्रवास सुखकर होणार

शरद वागदरे

वाशी : नवी मुंबईतून मुंबई, मांडव्यापर्यंत जाण्यासाठी स्वस्त आणि मस्त प्रवास ठरणाऱ्या जलवाहतुकीसाठी सिडको नेरूळ येथे जेटी बांधत आहे. हे काम अंतिम टप्प्यात असून ते मार्च 2021 पर्यंत पूर्ण होणार आहे. त्यामुळे हा प्रवास आता दृष्टिक्षेपात आल्याचा विश्‍वास व्यक्त होत आहे. कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मध्यंतरी या कामाची गती मंदावली होती. 

खूशखबर : एन 95 मास्क अवघ्या ४९ रुपयांत

मुंबई, नवी मुंबई आणि मांडवा (अलिबाग) ही शहरे जलमार्गाने जोडण्यासाठी एप्रिल 2018 मध्ये नेरूळ जेट्टीच्या उभारणीला मंजुरी मिळाली. त्यासाठी सुमारे 111 कोटी रुपये खर्च होणार आहेत. हे काम दोन वर्षांत पूर्ण होणे अपेक्षित होते; मात्र वन विभागाची ना हरकत मिळण्यास जवळपास 16 महिन्यांचा विलंब लागला. त्यामुळे काम उशिराने सुरू झाले. अनेक अडथळे पार करून सुरू झालेले जेटीचे काम आता अंतिम टप्प्यात आहे. 

खासदार राजन विचारे यांनी या जेटीची पाहणी केली. या वेळी सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी, जिल्हाप्रमुख दिलीप घोडेकर, शहरप्रमुख विजय माने यांच्यासह सिडकोचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. 

मेरीटाईम बोर्डाकडे हस्तांतर 
प्रवासी जलवाहतुकीसाठी आवश्‍यक असलेल्या नेरूळ जेटीचे काम उशिराने सुरू झाले आहे; मात्र हे काम येत्या पाच महिन्यांत पूर्ण करून जेटी महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाकडे हस्तांतरित करण्यात येणार आहे, असे सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय मुखर्जी यांनी या वेळी सांगितले. 


रस्त्यांवरील वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी सरकारने जल प्रवासी वाहतुकीला विशेष प्राधान्य दिले आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई, अलिबाग, मांडवा या ठिकाणांना जोडणाऱ्या जलवाहतुकीमधील सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. जलवाहतूक सुरू झाल्यानंतर रस्ते मार्गाने होणारा अडीच तासांचा प्रवास 25 मिनिटांवर येणार आहे. 
- राजन विचारे, खासदार 

(संपादन : नीलेश पाटील)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Liquor Scam: मनीष सिसोदिया यांना दिलासा नाहीच, न्यायालयीन कोठडीत 15 मे पर्यंत वाढ

Shekhar Suman: हिरामंडी फेम अभिनेते शेखर सुमन यांचा भाजपमध्ये प्रवेश

Lok Sabha Election 2024 Phase 3 LIVE Updates : गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी बजावला मतदानाचा हक्क

Rekha Jhunjhunwala: रेखा झुनझुनवालांचे एका दिवसात 800 कोटींचे नुकसान; शेअर बाजारात नेमकं काय झालं?

Met Gala 2024 : Met Gala कसा बनला फॅशन जगतातला ऑस्कर ? जाणून घ्या यंदाची थीम अन् इतिहास

SCROLL FOR NEXT