मुंबई

नवी मुंबईत मनसे नेत्यांची उघड उघड गुंडगिरी, तीन पदाधिकाऱ्यांना वाशी पोलिसांकडून दट्ट्या

सुजित गायकवाड

नवी मुंबई : पोलिस असल्याची बतावणी करुन टेम्पो चालकाला रस्त्यात अडवून त्याच्याजवळची रोख रक्कम लुटल्याप्रकरणी मनसेच्या नवी मुंबईतील तीन पदाधिकाऱ्यांना वाशी पोलिसांनी अटक केली आहे. यात कोपरखैरणेतील दोन शाखा अध्यक्षांसह कामगार सेनेच्या चिटणीसचा समावेश आहे. यातील चौथा आरोपी फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

पोलिसांनी अटक केलेल्यामध्ये २२ वर्षीय महाराष्ट्र नवनिर्माण सेना कामगार सेनेचा सरचिटणीस प्रशांत शिंदे, २९ वर्षीय कोपरखैरणेतील शाखा अध्यक्ष मिथून राजगे आणि हरिश्‍चंद्र पाष्टे या तिघांचा समावेश आहे.

हे तिघे व त्यांचा चौथा साथीदार, हे चौघेही बुधवारी रात्री वाशीतील अरेंजा सर्कल चौकात कारने गेले होते. रात्री 10.30 वाजण्याच्या सुमारास ३० वर्षीय अब्दुल हालीम चौधरी हा टेम्पो चालक वाशीतून टेम्पो घेऊन शिळफाटा येथे जात असताना अरेंजा सर्कल चौकात उभ्या असलेल्या या चौघांनी त्याला अडविले. त्यानंतर त्यांनी पोलिस असल्याचे सांगून जबरदस्तीने त्याच्या खिशातून 400 रुपये काढून घेतले.

हे चौघे इतक्‍यावरच थांबले नाहीत तर, त्यांनी टेम्पो चालकाला शिवीगाळ करुन तसेच जिवे ठार मारण्याची धमकी देऊन त्याच्याकडून जबरदस्तीने फोन पेचा पासवर्ड घेतला. त्यानंतर त्याद्वारे 800 रुपये आपल्या मोबाईलवर ट्रान्सफर करुन घेतले. यानंतर टेम्पो चालकाने वाशी पोलीस ठाणे गाठून तक्रार दाखल केली होती. न्यायालयाने या तिघांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.  

navi mumbai news MNS leaders openly bullied tempo driver in navi mumbai three people under arrest

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: चेन्नईला आव्हान देण्यासाठी पंजाब सज्ज; आत्तापर्यंत कोणाचं पारडं राहिलंय जड

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT