'ही' बस! ...जिला प्रवाशांची मिळतेय सर्वाधिक पसंती 
मुंबई

'ही' बस! ...जिला प्रवाशांची मिळतीये सर्वाधिक पसंती

सकाळ वृत्तसेवा

नवी मुंबई : नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेच्या ताफ्यात दाखल झालेल्या पर्यावरणपूरक इलेक्‍ट्रिक बस सेवेला नवी मुंबईकरांनी भरभरून प्रतिसाद दिला. केंद्र सरकारकडून फेम- 1 योजनेंतर्गत दाखल झालेल्या 30 बसपैकी 27 बस 1 डिसेंबरपासून प्रवाशांसाठी सुरू करण्यात आल्या. प्राथमिक स्वरूपात परिवहन सेवेने सुरू केलेल्या चार मार्गावर या बसेस धावल्या असून, त्याद्वारे अवघ्या 25 दिवसांमध्ये 21 लाख रुपये तिकिटातून जमा झाले आहेत. या बसमधून पहिल्या टप्प्यासाठी इतर बसप्रमाणे अवघे 9 रुपये भाडे आकारले जात आहे. 

शासनाच्या अवजड उद्योग मंत्रालयाने शहरांतर्गत प्रवासी वाहतुकीसाठी विजेवरील बसचा वापर वाढावा. यासाठी विविध महापालिकांना 60 टक्के अनुदानावर इलेक्‍ट्रिक बस घेण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार नवी मुंबई महापालिकेने फेम- 1 या योजनेंतर्गत 30 बसचा प्रस्ताव केंद्राला पाठविला होता. याला मंजुरी मिळाल्यानंतर या बस काही महिन्यांपासून टप्प्याटप्प्याने नवी मुंबईत दाखल झाल्या. यापूर्वी 20 बस शहरात आल्या होत्या. प्रायोगिक तत्त्वावर परिवहन उपक्रमाने प्रवाशांना आकर्षित करण्यासाठी या विद्युत वातानुकूलित 15 बसची प्रवासी सेवा सुरू केली होती. साध्या बसचे तिकीट तात्पुरते आकारले जात होते. 21 नोव्हेंबर रोजी उर्वरित सर्व बस नवी मुंबई परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात आल्या. त्यानंतर प्रादेशिक परिवहनकडून तपासणी झाल्यानंतर 1 डिसेंबरपासून दाखल झालेल्या एकूण 30 बसपैकी 27 बस प्रत्यक्षात प्रवाशांच्या सेवेसाठी सुरू करण्यात आल्या. प्रायोगिक तत्त्वावर सुरू असलेल्या या बस सेवेला गेल्या काही दिवसांत चांगला प्रतिसाद मिळत असून, यामुळे प्रवासी संख्येतही वाढ होत आहे. 

सीबीडी, वाशीतील प्रवाशांची सर्वाधिक पसंती 
केंद्राकडून मिळालेल्या या पर्यावरणपूरक बसचा प्रभावी वापर करून अधिक उत्पन्न घेणारी, नवी मुंबई परिवहन सेवा ही एकमेव परिवहन सेवा ठरली आहे. नवी मुंबई महापालिकेने बस मार्ग- 9 वाशी रेल्वेस्थानक ते घणसोली घरोंदा, बस मार्ग- 20 घणसोली ते नेरूळ, बस मार्ग- 121 घणसोली ते ताडदेव, बस मार्ग- 105 सीबीडी बस स्थानक ते वांद्रे रेल्वेस्थानक असे चार प्रवासी मार्ग सुरू केले आहेत. यातील 9 व 105 मार्गावरील प्रवाशांनी अधिक पसंती दिली असून, त्यातून 17 लाखांचे; तर इतर मार्गावरून 4 ते 5 लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. 

देखाभालीसाठी अवघा 5 रुपये खर्च 
पर्यावरणपूरक इलेक्‍ट्रिक बसमुळे प्रदूषणाला आळा बसणार असून, इंधन बचतीलाही हातभार लागत आहे. परिवहनला वातानुकूलित व्होल्वो बसला प्रति किमीकरिता इंधन व मेंटेनन्सकरिता 35 रुपये खर्च लागत असून, नव्या इलेक्‍ट्रिक बसला हाच खर्च अवघा 5 रुपये लागत असल्याने परिवहनची प्रतिकिलोमीटर 30 रुपयांची बचत होत आहे. 

लवकरच तीन चार्जिंग स्टेशन 
या सर्व बस सुरू झाल्यानंतर प्रवासी संख्येत अधिक वाढ होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे या बससाठी चार्जिंग स्टेशनही वाढवण्यात येणार आहेत. घणसोली, वाशी रेल्वे स्टेशन व सीबीडी बसस्थानकात चार्जिंग केंद्रांचे काम सुरू आहे. 

नवी मुंबई महापालिका परिवहन सेवेने मागील काही वर्षांपासून प्रवाशांकरिता आधुनिक सुविधा दिल्या. इलेक्‍ट्रिक बस सेवेला प्रवाशांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. विजेवर चालणाऱ्या या बसमुळे प्रदूषण होत नसून, प्रवाशांना आरामदायी प्रवास करता येत आहे. यामुळे देखभाल खर्चदेखील वाचला आहे. प्रवाशांना नवीन वर्षात आणखी चांगल्या सुविधा देण्यावर प्रशासनाचा भर राहील. 
- शिरीष आरदवाड, परिवहन व्यवस्थापक, एनएमएमटी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Rain Alert: महाराष्ट्राला पाऊस पुन्हा झोडपणार, मुंबईसह १२ जिल्ह्यांत धो-धो कोसळणार; यलो अलर्ट जारी

INDW vs SA W World Cup Final: टीम इंडिया प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल करणार? एक डाव आपल्यावरच पडू शकतो भारी, दक्षिण आफ्रिकेला...

Shocking News : चौथीच्या मुलीने इमारतीवरुन उडी मारुन संपवलं जीवन; शाळेवर पुरावे नष्ट केल्याचा आरोप, नेमकं काय घडलं?

Samruddhi Express Way : एकाच कुटुंबातील २३ जण निघाले होते शेगावला, इगतपुरी बोगद्यात भीषण अपघात; दोघांचा मृत्यू

Nashik Cyber Fraud : शेअर ट्रेडिंगचा अनुभव असूनही फसले! निवृत्त अधिकाऱ्याने २.२४ कोटींची आयुष्यभराची कमाई गमावली

SCROLL FOR NEXT