file photo
file photo 
मुंबई

नवी मुंबईतील प्रदूषण धोकादायक पातळीवर 

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : नवी मुंबईतील हवेचा दर्जा शनिवारीही खालावलेलाच होता. प्रदूषणाची पातळी धोकादायक पातळीवरच होती. 10 सिगारेटच्या धुराएवढे प्रदूषण प्रत्येक घनमीटर हवेत होते. मुंबईत हे प्रमाण सात सिगारेटच्या धुराएवढे होते. वांद्रे-कुर्ला संकुल जंक्‍शन येथेही 10 सिगारेटच्या धुराएवढे प्रदूषण होते. 

भारतीय उष्ण कटिबंधीय संस्थेच्या "सफर' उपक्रमांतर्गत नवी मुंबईतील प्रदूषणाची पातळी नोंदवण्यात आली आहे. नवी मुंबईतील हवा दोन दिवसांपासून अतिधोकादायक श्रेणीत होती. प्रदूषणात शनिवारी घट झाली असली, तरी ते धोकादायक श्रेणीतच असल्याची नोंद झाली. 

एका सिगारटेच्या धुरातून 22 मायक्रोग्रॅम धूलिकण (पीएम 2.5) तयार होतात. बर्कली अर्थ या पर्यावरण विज्ञान अभ्यास कंपनीने एका सिगारेटच्या धुरातून 22 मायक्रोग्रॅम पीएम 2.5 उत्सर्जित होत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. नवी मुंबईत शनिवारी प्रत्येक घनमीटर हवेत तरंगत्या धूलिकणांचे (पीएम 2.5) प्रमाण 229 मायक्रोग्रॅम होते. मुंबईत हे प्रमाण 127 मायक्रोग्रॅम नोंदवण्यात आले. 

लोणावळा, खंडाळा या घाटमाथ्यावर वाहनांतून उत्सर्जित झालेली प्रदूषके व नवी मुंबईच्या हद्दीवरील कारखान्यांमधून होणाऱ्या प्रदूषणामुळे शहराची हवा खराब होत आहे. ही प्रदूषके मुंबईपर्यंत वाहून येतात; मात्र त्यांचा प्रभाव कमी झालेला असतो. दोन दिवसांपासून नवी मुंबईत श्‍वास घेणेही कठीण झाले असून, रविवारही दूषित हवेतच काढावा लागणार आहे. नवी मुंबईत रविवारीही हवा धोकादायक श्रेणीतच राहील. 
नवी मुंबईच्या तुलनेत मुंबईतील हवा शुद्ध असली, तरी तेथे मध्यम स्वरूपाचे प्रदूषण आहे. भारतीय निकषानुसार प्रत्येक घनमीटर हवेत पीएम 2.5 चे प्रमाण 40 मायक्रोग्रॅमपेक्षा कमी असणे आवश्‍यक आहे. हे प्रमाण मुंबईत तिप्पट होते. 

............

बीकेसी सर्वांत प्रदूषित 
मुंबईतील प्रमुख वाहतूक जंक्‍शन असलेले वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) शहरातील सर्वांत प्रदूषित ठिकाण होते. तेथे शनिवारी पीएम 2.5 चे प्रमाण 210 म्हणजे नवी मुंबईपेक्षा अवघे 9 एकक कमी होते. प्रत्येक घनमीटर हवेत साडेनऊ ते 10 सिगारेटच्या धुराएवढे प्रदूषणाचे प्रमाण होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024 RCB vs GT: फाफची दमदार सुरुवात अन् कार्तिकचा फिनिशिंग टच... मधली फळी गडगडली तरी बेंगळुरूची विजयाची हॅट्रिक

Raj Thackeray : ''त्यांना मुख्यमंत्रीपद हवं होतं म्हणून ते मोदींवर टीका करतायत'' कणकवलीतून राज ठाकरेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

Sharad Pawar : 'होय, शरद पवार अतृप्त आत्मा....'; किरण मानेंनी कारकीर्दच मांडली

ISL 2024: मुंबई सिटी ठरले चॅम्पियन! अंतिम सामन्यात मोहन बगानला चारली पराभवाची धूळ

Prajwal Revanna Case : एचडी रेवन्ना एसआयटीच्या ताब्यात; प्रज्ज्वल यांच्याविरोधात CBI कडून ब्लू कॉर्नर नोटीस निघण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT