Nawab Malik News Sakal
मुंबई

Nawab Malik: नवाब मलिकांना झटका! हायकोर्टानं फेटाळला जामीन

मलिक हे किडनीच्या आजारानं ग्रस्त आहेत, त्यांच्यावर उपचारही सुरु आहेत.

Amit Ujagare (अमित उजागरे)

आर्थिक घोटाळा प्रकरणात तुरुंगात असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक यांचा जामीन अर्ज मुंबई हायकोर्टानं गुरुवारी फेटाळून लावला. त्यामुळं त्यांना मोठा झटका बसला आहे. वैद्यकीय कारणास्तव आपल्याला जामीन मंजूर व्हावा अशी मागणी त्यांनी जामीन अर्जातून केली होती. (Nawab Malik bail plea rejected by Mumbai High Court)

न्या. अनुजा प्रभुदेसाई यांनी हा निकाला दिला आहे. तसेच दोन आठवड्यांनंतर त्यांच्या जामीनाच्या याचिकेवर योग्यतेनुसार सुनावणी घेण्यात येणार आहे. आपलं एक मुत्रपिंड निकाली झालं असून दुसरं केवळं ६० टक्के काम करत आहे. (Latest Marathi News)

ही स्थिती आणखी बिघडत आहे, त्यामुळं आपल्याला योग्य पद्धतीनं उपचार करता यावेत यासाठी जामीन मंजूर करण्यात यावा, अशी मागणी मलिक यांनी आपल्या याचिकेतून केली होती. फेब्रुवारी २०२२ मध्ये अटकेपूर्वीपासून मलिकांना किडनीचा त्रास आहे. (Marathi Tajya Batmya)

दरम्यान, ईडीनं मलिकांच्या याचिकेला विरोध करताना असे अनेक लोक आहेत जे एकाच किडनीवर जगू शकतात. मलिकांच्या मेडिकल रिपोर्टमध्ये त्यांच्या दुसऱ्या किडनीची केवळ ६० टक्केच प्रक्रिया सुरु असल्याचं कुठेही म्हटलेलं नाही. त्यामुळं मलिकांच्या केसमध्ये जामीन मंजूर करण्यात येऊ नये.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ZIM : भारत उपांत्य फेरीच्या शर्यतीत कायम, आता फक्त वेस्ट इंडिजचा अडथळा! दक्षिण आफ्रिकेचा Semi Final प्रवेश पक्का

Find Aadhaar Centers on Google : 'UIDAI'ने उचललं मोठं पाऊल! लवकरच 'गुगल मॅप'ने शोधता येणार जवळचं आधार केंद्र

Bhigwan Accident : पुणे-सोलापुर राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघातात तीन ठारः मृतांमध्ये वाढदिवस असलेल्या नातवाचा आई व आजीसह मृत्यू

Daund Crime : पर्स स्टेशन जवळ टाकली, शोधा अन् घेऊन जा; चोरानेच दिला सल्ला

Pune Crime : गुंड नीलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला अटक

SCROLL FOR NEXT