Nawab Malik
Nawab Malik 
मुंबई

प्रशांत किशोर NCPसाठी रणनीती आखणार? नवाब मलिकांनी दिलं उत्तर

दीनानाथ परब

मुंबई: राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काल 'सिलव्हर ओक'वर जाऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे (ncp chief) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. तब्बल तीन तास ही बैठक चालली. या भेटीनंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. राजकीय क्षेत्रात विविध तर्क-वितर्क लढवले जात आहेत. भविष्यासाठी नेमकी कुठली रणनीती ठरली असेल? याबद्दल वेगवेगळे मतप्रवाह व्यक्त होत आहेत. (Nawab Malik on Prashant Kishors meeting with Sharad Pawar)

आता या बैठकीबद्दल महाराष्ट्र सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी माहिती दिली आहे. "प्रशांत किशोर यांनी काल शरद पवारांची भेट घेतली. त्यांना राष्ट्रवादी काँग्रेससाठी रणनीतीकार म्हणून नियुक्त करण्याबद्दल कुठलीही चर्चा झाली नाही. पवारसाहेबांना विरोधी पक्षांना एकत्र करायचे आहे. पुढच्या काही दिवसात त्यासाठी प्रयत्न केले जातील" असे नवाब मलिक यांनी सांगितले.

प्रशांत किशोर यांनी शरद पवारांसोबत दुपारचे भोजनही घेतले. तामिळनाडू आणि पश्चिम बंगालमध्ये डीएमके आणि तृणमुल काँग्रेसच्या विजयानंतर प्रशांत किशोर यांची शरद पवारांबरोबर ही पहिलीच भेट होती. विधानसभा निवडणुकीसाठी द्रमुक आणि तृणमुल काँग्रेस पक्षांसाठी निवडणूक रणनिती आखण्यात प्रशांत किशोर यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती.

प्रशांत किशोर यांनी स्वत:च ते आता राजकीय रणनीतीकार नसल्याचं सांगितलं आहे, असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. अनेक नेते प्रशांत किशोर यांच्या संपर्कात आहेत, असं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. राष्ट्रवादीचे दुसरे नेते छगन भुजबळ यांनी बैठकीच्या अजेंड्याबद्दल काहीही माहित नसल्याचे सांगितले. प्रशांत किशोर हे यशस्वी राजकीय रणनीतीकार आहेत. शरद पवार त्यांचे सल्ले नक्कीच विचारात घेतील, असे छगन भुजबळ म्हणाले. प्रशांत किशोर यांनी उद्धव ठाकरेंची सुद्धा भेट घेतली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CISCE Result 2024 : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल जाहीर; एका क्लिकवर पाहा रिझल्ट

Kangana Ranaut: कंगनानं थेट बिग बींसोबत केली स्वत:ची तुलना; भाषणाचा व्हिडीओ व्हायरल होताच नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले..."

Viral Video: लाईक्ससाठी पेटवलं जंगल ! सोशल मीडियावर आगीचा व्हिडिओ अपलोड केल्या प्रकरणी तिघांना बेड्या

Manisha Koirala : उमरावजान साकारणार होती मल्लिकाजान ? मनीषाने सांगितली 18 वर्षांपूर्वीची गोष्ट

Harshit Rana KKR vs LSG : कारवाईनंतरही हर्षित राणा सुधरला नाही; बीसीसीआयला पुन्हा डिवचलं?

SCROLL FOR NEXT